महाभारतातील ‘या’ कथेवरून ‘तृतीयपंथीय’ करतात एका दिवसाचं लग्न…

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ चालू असताना मनुष्याला मात्र या एका विषाणूने आपल्या मुळांशी जाण्यास भाग पाडले आहे .ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर श्वासोच्छ्वास किंवा कफद्वारे अतिशय झपाट्याने या रोगाचे संक्रमण अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात न येणे व कम्युनिटी स्प्रेड रोखणे हेच कोरोनाच्या संक्रमणाला आटोक्यात आणण्यासाठी एकमेव साधन आहे.
कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी येणारा मुख्य अडथळा म्हणजे अजूनही जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना टेस्टिंगसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आणि कोरोना ग्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी या रोगावर प्रभावी उपाय करू शकणाऱ्या औषध किंवा लसीचा शोध अद्यापही लागलेला नाही हे होय.
अशा परिस्थितीमध्ये या जागतिक महामारीच्या संकटाला दूर ठेवण्यासाठी लॉक डाऊन हा एकमेव पर्याय प्रभावी ठरू शकतो. अन्य सर्व देशांप्रमाणेच भारत सरकारने सुद्धा मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉक डाऊन सुरू केले आहे.लाँक डाऊनच्या काळामध्ये बाहेर केवळ अत्यावश्यक गरजा व्यतिरिक्त कुठे जाण्यास मज्जाव घातला गेला आहे त्यामुळे एकदम जवळपास दोन दशके मागे गेल्याचा.आभास निर्माण झाला आहे .रोजची लोकलची धावपळ, ऑफिसातील व्यस्त दिनक्रम यांमधून सुटका मिळवून आपल्याच कोशामध्ये व्यस्त असणारा चाकरमानी आप्तस्वकियांसोबत चार क्षण विरंगुळ्याचे या लाँकडाऊनच्या निमित्ताने का होईना घालवत आहे.
आज आपण अरावण या महान धनुर्धारी पांडव अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांच्या पुत्राशी निगडीत जीवन कथेला अनुसरून किन्नर समाज आजही पाळत असणाऱ्या एका अनोख्या व तितक्याच माणूस म्हणून स्वतःला आरसा दाखवणाऱ्या प्रथेला जाणून घेणार आहोत.
समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे अस्तित्व असते .स्त्री किंवा पुरुष अशी ओळख प्रत्येक जन्मनाऱ्या जीवाला निसर्गाने दिलेली असते.
स्त्री किंवा पुरुष या ओळखीने व्यक्ती समाजातील आपल्या या जबाबदाऱ्या व भूमिका पार पाडत असतो .मात्र या ठिकाणी असे काही जीव असतात ज्यांना निसर्गाने स्त्री किंवा पुरुष अशी लैंगिक ओळख दिलेली नसते .या समुदायाला तृतीयपंथीय असे म्हटले जाते. तृतीयपंथीयांमध्ये मुख्यतः शारीरिक संरचनेच्या विरुद्ध अशी त्यांची लैंगिक भावना असते. समाजात आज सुद्धा तृतीयपंथीयांच्या लैंगिकतेला मान्यता मिळालेली नाही.आजही त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतले जात नाही. नोकरीच्या ठिकाणी, शिक्षण घेताना किंवा समाजामध्ये वावरतांना सुद्धा त्यांना उतरंडीच्या तळाशी ठेवले जाते.
तृतीयपंथीयांना नेहमीच आपल्या लैंगिक भावनांना दडपून ठेवावे लागते.आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांकडूनसुद्धा झिडकारल्या गेलेल्या तृतीयपंथीयांना त्यांच्या सारख्या असलेल्या तृतीय पंथीय समुदायाकडून मात्र एका परिवारा प्रमाणे आसरा दिला जातो .जसा एखाद्या धर्म किंवा कुटुंबाच्या प्रथा असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते अगदी त्याचप्रमाणे किन्नर किंवा तृतीयपंथीयां कडूनही काही प्रथांचे पालन वर्षानुवर्षे केले जात आहे. काही प्रथांपैकी तृतीयपंथी यांकडून साजरी केली जाणारी प्रथा म्हणजे कुवगम होय. किन्नर समाजाला विवाहबंधनापासून नेहमीच दूर ठेवले जाते.
आयुष्यभर आपल्या सहजीवनाच्या कल्पनांना दूर सारून एकाकीपणे केवळ आपल्या पंथाला आपले कुटुंब मानून जगणाऱ्या तृतीयपंथीयांना कुवगम उत्सवा द्वारे एका दिवसासाठी का होईना लग्न साजरे करण्याचा मान दिला जातो.कुवगम हा उत्सव नागकन्या उलुपी आणि पांडव अर्जुन यांचा पुत्र अरावण याच्या स्मरणार्थ केला जातो.
महाभारतातील पांडव आणि द्रौपदी यांचे जीवन हे आजही भारावून टाकणारे असे आहे. अर्जुनाने स्वयंवरामध्ये द्रौपदीला जिंकून घेतल्यानंतर नियतीच्या लिखितामुळे द्रौपदीला पाच पांडवांची पत्नी बनवून आयुष्यभर राहावे लागले होते. याच काळात एकदा अर्जुनाने पांडवांमधील जेष्ठ बंधू युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्या एकांतवासा मध्ये विघ्न आणले होते याची शिक्षा म्हणून अर्जुनाला एक वर्षभर वनवासा मध्ये जावे लागले होते.
या वनवासाच्या कालावधीमध्ये अर्जुन आणि नाग कन्या उलुपी यांची भेट झाली व त्यांच्या मिलना मधून अरावण या अर्जुन पुत्राचा जन्म झाला. महाभारताच्या आत्तापर्यंत सर्वात जास्त संहारक मानल्या गेलेल्या युद्धाच्या अगोदर प्रथेप्रमाणे काली मातेची पूजा केली गेली व या पूजेला आहुती म्हणून एखाद्या धैर्य शाली राजपुत्राचा बळी देण्याची आज्ञा करण्यात आली.
यावेळी कोणताही राजकुमार आहुती म्हणून आपले जीवन अर्पण करायला तयार झाला नाही. मात्र अरावण अशा परिस्थितीत पुढे सरसावला. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला आयुष्यातील विवाह सुख अद्यापही न उपभोगलेल्याअरावणाने केवळ एक अट आहुती जाण्यापूर्वी घातली ती म्हणजे आहुती जाण्यापूर्वी विवाह करण्याची इच्छा होय. केवळ एक दिवसासाठी अरावणाची पत्नी बनून तो आहुती गेल्यानंतर त्याची विधवा म्हणून संपूर्ण आयुष्य कंठण्यास कोणतीही राजकुमारी किंवा स्त्री तयार होईना इतकेच काय तर विधवा म्हणून अगोदरच आयुष्य जगत असलेल्या स्त्रियांनीसुद्धा अरावणाची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला.
या परिस्थितीमध्ये पांडवांचे तारणहार भगवान श्रीकृष्ण पुढे आले व त्यांनी मोहिनीचा अवतार धारण करून अरावणा सोबत विवाह केला. अरावणाच्या कथेला अनुसरून किन्नर समाज कुवगम ही प्रथा साजरी करून एका रात्रीसाठी अरावणा सोबत विवाह करून त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
हा उत्सव दरवर्षी तमिळनाडूमधील कुवगम या गावामध्ये साजरा केला जातो. कुवगम या गावामध्ये कोथावंलर हे मंदिर अरावणाचे मंदिर मानले जाते.चैत्राई या तमिळनाडूमधील नववर्षाच्या सुरुवातीला हा उत्सव सुरू होतो जो 18 दिवस चालू असतो. हा उत्सव खूप प्रसिद्ध असा उत्सव आहे.सतराव्या दिवशी किन्नरांच्या अरावण सोबतचा विवाह संपन्न होतो. किन्नर या दिवशी आपल्या आयुष्यात होणाऱ्या पहिल्या व शेवटच्या लग्नासाठी नखशिखांत शृंगार करतात.
ताळी हे तमिळनाडूमधील मंगळसूत्र ते परिधान करतात व अग्नीच्या साक्षीने अरावणा सोबत सहजीवनाला सुरुवात करतात. रात्रभर अरावण याआपल्या पतीसोबत किन्नर नाचगाणे करतात व आत्तापर्यंत आयुष्यामध्ये ज्या आनंदाला ते मुकले आहेत तो आनंद या एका रात्रीमध्ये समाज मान्यतेने उपभोगतात.कुवगम या उत्सवाच्या शेवटच्या अठराव्या दिवशी व रावणाच्या आहुतीचा दिवस असतो.या दिवशी यज्ञाला अरावणाची आहुती देण्याचे सर्व सोपस्कार जसे की रांगोळी काढणे ,धार्मिक गाणी म्हणणे इत्यादी पूर्ण केले जाते व त्यानंतर अरावणाची आहुती दिली जाते.
तसेच या क्षणी किन्नर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकतात, कपाळावरील सौभाग्याचे लक्षण असलेले कुंकू पुसून टाकतात व पति गेल्यावर विधवा जसे दुःख करतात तसे ऊर बडवून बडवून रडून व्यक्त करतात.कुवगम उत्सव संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या किन्नरांच्या जथ्थ्या मध्ये परतून हे किन्नर आपले आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू करतात.