महेश भट्टने रियासोबत कॅमेरासमोर केली ‘अशी’ हरकत, पाहून दंग व्हाल..! मुलीला किस केल्यामुळे आला होता चर्चेत..

महेश भट्टने रियासोबत कॅमेरासमोर केली ‘अशी’ हरकत, पाहून दंग व्हाल..! मुलीला किस केल्यामुळे आला होता चर्चेत..

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जग सोडून गेल्यानंतर त्याच्या संबंधित अनेक व्यक्ती सध्या प्रसारमाध्यमांवर चर्चेत आहेत. सुरुवातीला अंकिता लोखंडे हिचे नाव पुढे आल्यानंतर सुशांतची दुसरी गर्लफ्रेंड राहिलेली रिया चक्रवर्ती देखील आता माध्यमात ट्रोल होत आहे. तसेच या प्रकरणात सलमान खान याला देखील चाहत्यांनी चांगलेच भंडावून सोडले आहे.

तसेच इतर मोठ्या प्रोडक्शन हाऊसची अशी पोलिस चौकशी करत आहेत. रिया चक्रवर्ती हिची पोलिसांनी तब्बल बारा तास चौकशी केली होती. या मधील सत्य माध्यमांसमोर येणारच आहे. मात्र, या प्रकरणात आता एक नव्याने नाव जोडण्यात येत आहे. ते म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट यांचे. महेश भट्ट यांचे वय सध्या ७१ वर्ष असले तरी त्यांचे चाळे अजूनही तसेच आहेत.

त्यानंतर महेश भट यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यावर कहर म्हणजे महेश भट यांनी पूजा भट आपली मुलगी नसती तर मी तुझ्यासोबत लग्न केले असते, असे म्हणून त्यावर कहर केला. महेश भट्ट यांनी पूजा भटला घेऊन अनेक चित्रपट केले. यामध्ये त्यांचा सडक हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात संजय दत्त याची भूमिका होती.

चित्रपटात पूजा वेश्येच्या रुपात दाखवण्यात आली होती. तरी देखील हा चित्रपट हिट झाला होता. यातील सदाशिव अमरापूरकर यांची भूमिकाही आपलातुन गाजली होती. महेश भट यांचे चित्रपट अतिशय बोल्ड स्वरूपाचे असतात. काही वर्षापासून त्यांनी त्यांचा भाचा इम्रान हाश्मी याला घेऊन अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

त्यांचे अनेक चित्रपट हे बोल्ड आणि किसिंग दृश्याने ओतप्रोत भरलेले असतात. तसेच हे चित्रपट हिट देखील होतात. मात्र, सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासोबत देखील ते सध्या माध्यमातून चांगले ट्रो ल होत आहेत. महेश भट यांनी रिया चक्रवर्तीसोबत जिलेबी या चित्रपटात काम केले आहे. मात्र, असे असले तरी एक व्हिडीओ त्यांचा सध्या खूप व्हायरल होत आहे.

तसेच काही छायाचित्रे देखील व्हायरल होत आहेत. हे छायाचित्र दोन वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. एका फोटोमध्ये रिया चक्रवर्तीच्या खांद्यावर महेश भट्ट डोकं ठेवून बसलेले दिसतात आणि रिया चक्रवर्ती ने देखील त्यांना पकडून ठेवले आहे असे दिसत आहे. त्यानंतर समाज माध्यमांमध्ये खूप टीका होत असल्याचे दिसत आहे.

एक व्हिडिओ असा शेअर झाला आहे की, त्यामध्ये महेश भट हे रिया चक्रवर्तीची खूप तारीफ करताना दिसत आहेत आणि आनंद बक्षी यांचा एक शेअर म्हणताना दिसत आहेत. या देशांमध्ये सीता बदनाम झाली, तर तू काय आहेस, असे म्हणत ते तिची वेगळ्या पद्धतीने तारीफ करताना दिसत आहेत.

या व्हिडिओ वरून देखील महेश भट चांगले ट्रॉल झाल्याचे पहायला मिळत आहेत. महेश भट आणि रिया चक्रवर्ती यांच्यात काय नाते आहे, याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे. याबाबत अजून आलिया भट किंवा इतरांनी कोणी खुलासा केलेला दिसत नाही. मात्र महेश भट यांच्या स्वभावावरून त्यांनी काहीतरी रिया चक्रवर्ती सोबत घृणास्पद कृत्य केले असेल, असे सांगण्यात येत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *