२ पत्नी, ३ अपत्ये असे आहे महेश मांजरेकरांचे वैयक्तिक आयुष्य ! पहिली पत्नी तर आहे अभिनेत्रीहून सुंदर, बघा Photo…

२ पत्नी, ३ अपत्ये असे आहे महेश मांजरेकरांचे वैयक्तिक आयुष्य ! पहिली पत्नी तर आहे अभिनेत्रीहून सुंदर, बघा Photo…

बिग बॉस मराठीचे, तिसरे पर्व पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे सगळीकडेच बिग बॉसची चर्चा सुरु आहे. सोबतच, चर्चा सुरु झाली ती महेश मांजरेकरांची. या वीकेंडच्या वेळी महेश मांजरेकर यांचा लूक बघून अनेकांना, महाराष्ट्रातील दिग्गज नेते, छगन भुजबळ यांची आठवण झाली.

कारण, त्या लूकमध्ये महेश मांजरेकर छगन भुजबळ सारखेच दिसत होते. मात्र, यंदाच्या पर्वातदेखील त्यांचा हटके अंदाज बघायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, त्यांची आणि त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक मोठं आणि मानाचं नाव म्हणून महेश मांजरेकर यांची ओळख आहे.

नुकतंच सईने, सलमान खानच्या दबंग३ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्या लुकचा आणि अभिनयाचे चांगलेच कौतुक देखील केले गेले होते. आता नवीन प्रोजेक्टसवर सई काम करत आहे. महेश मांजरेकर यांच्या मेधा या दुसऱ्या पत्नी आहेत. दीप मेहता या महेशच्या पहिल्या पत्नी. दीपा आणि महेश याना अश्वमी आणि सत्या दोन अपत्यसुद्धा झाली.

मात्र, एका सुखी संसारात जे सर्व हवे असते, ते त्याच्या संसारात नव्हते. त्यामुळे दीपा आणि महेश यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची दोन्ही मुलं महेश मांजरेकरांसोबतच राहतात. दीपा यांनी कायमच स्वतःला अभिनय क्षेत्रापासून दूर ठेवले आहे. मात्र त्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रचंड सक्रिय आहेत. क्वीन ऑफ हार्ट्स या नावाचा साड्यांचा ब्रँड त्या यशस्वीरित्या चालवत आहेत.

अनेक मराठी अभिनेत्री, त्यांच्या या साड्या मोठ्या हौसेने घालतात. त्यांची मुलगी अश्वमी, क्वीन ऑफ हार्ट्स या साडीच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये झळकत असते. अश्वमीने अनेक छोट्या मोठ्या जाहिराती केल्या आहेत आणि सोबतच अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा ती प्रयत्न करत आहे.

लवकरच अश्वमी देखील, मराठी सिनेमामधून काम करणार असलायचं बोललं जात आहे. अश्वमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. मात्र, तिची आई अर्थात दीपा मेहता यादेखील सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांचासुद्धा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.