केवळ महिनाभरात बॉलिवूडच्या ‘या’ 11 अभिनेत्यांचा झाला मृत्यू, 2020 साल बनले बॉलीवुडसाठी कर्दनकाळ, नंबर 2 होते बॉलीवूडचे लाडके…

केवळ महिनाभरात बॉलिवूडच्या ‘या’ 11 अभिनेत्यांचा झाला मृत्यू, 2020 साल बनले बॉलीवुडसाठी कर्दनकाळ, नंबर 2 होते बॉलीवूडचे लाडके…

२०२० हे वर्ष सर्वासाठी अतिशय त्रासदायक ठरले आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात गेल्या सत्तर दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून लॉकडाऊन आहे. या कालावधीमध्ये अनेकजण घरी बसून आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या. कंपन्यांनी अनेकांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे अनेक जण सध्या बेकार झाले आहेत.

अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. तसेच यंदाच्या वर्षात नैसर्गिक संकट देखील मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच यंदाचे वर्ष बॉलिवूडसाठी देखील फारसे चांगले राहिले नाही. कोरोनामुळे एक दोन चित्रपट प्रदर्शित झाल्याचे आपण पाहिले असेल. त्यानंतर अनेक चित्रपटांचे प्रदर्शन देखील लांबणीवर पडले.

२. ऋषी कपूर : बॉलीवूडचे हे दिग्गज अभिनेते होते. कपूर यांना देखील कॅन्सर आजाराचे निदान झाले होते.त्यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या निधनाने अनेकांना शोक झाला.

३. वाजीद खान : साजिद-वाजिद या जोडीपैकी वाजीद खान याला देखील किडनीचा त्रास होता. त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याचाही काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. साजिद-वाजिद या जोडीने बॉलीवूडला अनेक हे चित्रपटात संगीत दिले आहे.

४. योगेश गौर : बॉलीवुडचे हे दिग्गज गीतकार होते. त्यांनी कही दूर जब दिन ढल जाये, हे गाणे बॉलीवूड ला दिले. हे गाणे अजरामर झाले. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

५. मोहित बघेल: मोहित बघेल हा बऱ्याच चित्रपटातून दिसला होता. सलमान खान याच्या जय हो चित्रपटात त्याने काम केले होते. नुकतेच त्याचेही एका आजाराने निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर अनेकांना जबर धक्का बसला होता.

६. मनमीत ग्रेवाल : मम्मी ग्रेवाल यांनी अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे. नुकतेच अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले आहे त्याच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले.

७. अभिजीत: शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या कंपनीत अभिजित हा पार्टनर होता. अभिजीतने शाहरूखसोबत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याचे देखील नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर शाहरुख खान याला चांगलाच धक्का बसला होता.

८. सचिन कुमार: अक्षय कुमार याचा भाचा असलेला सचिन कुमार याचेदेखील नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. सचिनने अनेक मालिकांत काम केले होते. अक्षय कुमार आपला प्रेरणास्थान असल्याचे तो अनेकदा सांगायचा.

९. अमोस : अमोस दिग्गज अभिनेता आमिर खान याचा असिस्टंट म्हणून काम करायचे. पंचवीस वर्ष त्यांनी आमिर खान सोबत काम केले. त्यांच्या निधनानंतर आमिर खान याला चांगलाच धक्का बसला होता.

१०.साई गुंडेवार : साई गुंडेवार याने अनेक चित्रपटात बॉलिवूडमध्ये काम केले. तसेच काही चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. साई याने आमिर खानचा पिके आणि इतर चित्रपटात काम केले. त्याला ब्रेन कॅन्सर झाला होता. त्याचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले.

११. शफिक अन्सारी: शफिक अन्सारी हे ज्येष्ठ अभिनेते होते. त्यांनी अनेक मालिका व चित्रपटात काम केले. त्यांना नुकतेच कॅन्सरचे निदान झाले होते. मात्र, वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *