कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला बसला आर्थिक फटका, मेकअपमननेच केली मदत, खाण्याचेही झालेत वांदे…

कोरोनामुळे देशभरात गेल्या चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवसांपासून लाॅकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात जात आहेत. यामुळे ही साथ अजूनच वाढत आहे. याचा फटका सर्वांनाच बसला आहे आणि त्यांना पगार देखील मिळत नाही, तर काहीजणांचे 50 टक्के पगार केल्या जात आहेत.
तर गेल्या काही दिवसांपासून चित्रपट देखील बंद आहेत. त्याचा फटका मालिकांना देखील बसला आहे. मालिकेतील कामगार तसेच इतर कर्मचारी वर्ग बेकार झाले आहेत. त्यांना मोठे अभिनेते मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक अभिनेते असे आहेत की, ते कामगारांचे दोन महिन्याचे रेशन पण भरत आहेत. तसेच त्यांच्या घरी आर्थिक मदत देखील करतात.
या अभिनेत्रीने आजवर ये रिश्ता क्या कहलाता है, शास्त्री मिस्टर, साम-दाम-दंड-भेद, लाल इश्क या मालिकांत काम केले आहे. तर तिचं नाव आहे सोनल वेंगुर्लेकर.. सोनल हिने हिंदीसह अनेक मालिकांमध्ये काम केले. मात्र, त्यामुळे तिच्या अनेक मालिका सध्या बंद पडल्या आहेत. काही शिल्लक रक्कम होती, त्यातून तिने तिचा आजवरचा चरितार्थ चालवला.
मात्र, आता पुढील महिन्यात घर चालवण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. मालिका बंद असल्याने दिग्दर्शकांनी देखील तिला पैसे देण्यास नकार दर्शवला आहे. याबाबत सोनल म्हणाली की, याबाबत मी माझ्या मेकअप मॅन पंकज गुप्ता यांना सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
त्यावर त्यांनी मला मदत देण्यास संमती दिली. मात्र, त्यांची पत्नी देखील गर्भवती आहे. अशा वेळेस मी त्यांच्याकडून पैसे घेणे योग्य नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांना मदत देऊ केली आहे.
अशी केली मदत..
मेकअप मॅन पंकज गुप्ता सोनाली हिला म्हणाला, सोनाली माझ्याकडे १५ हजार रुपये आहेत. तुम्हाला आता हवे असल्यास तुम्ही घ्या. मला माझ्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळेस द्या. मला थोडा धक्काच बसला. कारण ज्यांच्याकडे माझे हक्काचे लाखो रुपये अडकलेत ते आता माझा फोन उचलत नाहीयेत.
मला सोशल मीडियावर ब्लॉक करत आहेत. केवळ पैसा हा मुद्दा नाहीए. तर त्यामागची भावना महत्वाची आहे. माझे मेकअपमॅन पंकज गुप्ता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून मदत करण्यास तयार झाले. तथाकथित श्रीमंत लोकांनी आता मनाची श्रीमंती दाखवण्याची वेळ आली आहे.