मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा एकत्र अनेक चित्रपटात केलंय काम…

अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे नाव घेताच आपल्या चेहऱ्यावर हास्य येते. मकरंद अनासपुरे यांनी आजवर अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. मकरंद अनासपुरे यांचा सारखा विनोद आजवर कुठल्याही अभिनेत्याला जमला नाही, असेच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मात्र, यापूर्वी देखील मराठीमध्ये काही असे दिग्गज अभिनेते होऊन गेले आहेत. त्यांनी देखील आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले आहे. सर्वात आधी नाव येते ते दादा कोंडके यांचे. दादा कोंडके यांनी आपल्या द्विअर्थी संवा दाने प्रेक्षकांना चांगलच खळखळून हसविले होते. त्यानंतर मराठीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील आपल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसवले.
त्यानंतर नाना पाटेकर यांच्या वजुद या चित्रपटातही त्याला छोटी भूमिका मिळाली होती. त्याचप्रमाणे नाना पाटेकर यांच्या यशवंत या चित्रपटातही त्यांना काम मिळाले होते. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्राण जाये पर शान ना जाये’ हा चित्रपट देखील त्यांनी केला होता. या चित्रपटातील भूमिका चालली होती. चाळीमध्ये राहणारे लोक कसे वागतात, कसे बोलतात यावर आधारित हा चित्रपट होता.
हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर मकरंद अनासपुरे यांनी माय फ्रेंड गणेशा या चित्रपटातही काम केले होते. मकरंद यांनी डॅंबीस या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती देखील केली होती. या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला होता. त्यानंतर मकरंद अनासपुरे यांना खऱ्या अर्थाने ब्रेक दिला तो चंद्रकांत कुलकर्णी यांनी. कुलकर्णी यांच्या ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे दिसला होता.
हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले. ‘निशाणी डावा अंगठा’, ‘गाढवाचं लग्न’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ यासारखे अफलातून असे चित्रपट त्यांनी केले. आता मकरंद अनासपुरे नाम फाउंडेशन च्या माध्यमातून काम करत आहेत. याला नाना पाटेकर यांची देखील साथ मिळत आहेत.
मकरंद अनासपुरे यांची पत्नी देखील अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीने जवळपास पाच चित्रपटात काम केले आहे. यामध्ये कापूस, कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीने देखील काम केले आहे.
मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीचे नाव शिल्पा आहे 2000 मध्ये ‘जाऊ बाई जोरात’ या नाटकांमध्ये शिल्पा अनासपुरे या काम करत होत्या. या नाटकात मकरंद अनासपुरे देखील काम करत असताना या दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगि तली.
त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना लग्नाची परवानगी दिली. विशेष म्हणजे या दोघांचे आंतरजातीय लग्न आहे. 30 नोव्हेंबर 2001 रोजी औरंगाबाद येथे या दोघांनी विवाह केला. मकरंद अनासपुरे ला एक मुलगा व एक मुलगी आहे. आपल्या यशामध्ये पत्नीचा खूप मोठा वाटा आहे, असे मकरंद अनासपुरे नेहमी सांगत असतात.