वसीम रिझवीनंतर ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने सोडला इस्लाम धर्म, बिपीन रावत यांच्यावरील पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांना..

वसीम रिझवीनंतर ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने सोडला इस्लाम धर्म, बिपीन रावत यांच्यावरील पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांना..

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात CDS bipin rawat यांच्या निधनाच्या बातमीने सगळीकडे शोक पसरला आहे. असंख्य लोक अजूनही त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. तामिळनाडू येते हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचे निधन झाले होते. मात्र, अनेक जण या अपघावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. कारण CDS bipin rawat नेहमी कडक सुरक्षेमध्ये असायचे.

दरम्यान, त्यांच्या प्रत्येक वस्तूची शहनिशा केल्यानंतरच ती वस्तू CDS bipin rawat वापरत असे. तशीच शहनिशा त्यांच्या हेलिकॉप्टरची देखील होत होती त्याचबरोबर त्यांचा पायलट देखील उच्च प्रशिक्षित होता, अपघात घडला तेव्हा त्यांचा पायलट पृथ्वीसिंह चौहान होते, आणि हे देखील उच्च प्रशिक्षित पायलट आहे. विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान यांना अनेक वर्षांचा अनुभव होता. ते 109 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर देखील राहिले होते. त्यामुळे आता हा अपघात नक्की, अपघात आहे की षडयंत्र, असा प्रश्न संपूर्ण देशभरात उपस्थित केला जात आहे.

58 वर्षीय अकबर यांचा जन्म 1963 साली वायनाड, केरळ याठिकाणी झाला होता. ते व्यवसायाने दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि गीतकार आहेत. ते प्रामुख्याने मल्याळम सिनेमात सक्रीय आहेत. MSIDB च्या माहितीनुसार, अकबर यांनी 1988 मध्ये फिल्म्समधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. याशिवायही ते अनेक चित्रपटांचा भाग होता. IMDB च्या मते, ते ग्रामपंचायत (1998), सीनिअर मँड्रेक (2010) या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat Demise) यांची आणि देशाची बदनामी झाल्यामुळे त्यांनी इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये त्यांनी असे वक्तव्य केले होते की, मदरशात राहताना एका ‘उस्तादा’ने त्यांचे लैंगिक शोषण केले होते. अली अकबर यांच्याविषयी जाणून घ्या सविस्तर..

अकबर यांनी असे म्हटले की, ‘आज मी जन्मापासून मिळालेला पेहराव फेकून देत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही, भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो स्मायलिंग इमोटिकॉन पोस्ट केले आहेत’. अनेक मुस्लिम युजर्सनी त्यांच्या पोस्टला विरोध केला आणि त्याला अपमानास्पद शब्द वापरले आहेत. मात्र, अनेक युजर्सनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. दरम्यान काही वेळाने ही फेसबुक पोस्ट गायब झाली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.