घटस्फोटानंतरही मलयकाला पुन्हा व्हायचंय खान परिवाराची सून….कारण ऐकून चकित व्हाल…

घटस्फोटानंतरही मलयकाला पुन्हा व्हायचंय खान परिवाराची सून….कारण ऐकून चकित व्हाल…

बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी मलायका आणि अर्जुन त्यांच्यातील असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या बऱ्यापैकी चर्चेत आहेत. दुसरीकडे अभिनेता अर्जुन कपूरला डेट करण्यापूर्वी मलायकाने अरबाजशी घटस्फोट देखील घेतला आहे, त्यानंतर दोघांनीही स्वतःचा वेगवेगळा मार्ग निवडला आणि मागे वळून पाहिले नाही. आजकाल लॉकडाउन चालू आहे आणि सेलेब्रिटींचे बरेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर मलायकाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे जो करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण मधील आहे. ज्यात मलायका सांगत आहे की ती म्हणजे जेव्हा तिने अरबाजच्या घरात प्रवेश केला तेव्हा तिथले दृश्य तीने पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले होते. ते सगळ आलिशान दृश्य बघून मलायका देखील खुश झाली होती.

मलायका अरोरा जरी अरबाज खानपासून विभक्त झाली असली, तरीही तिला त्या घरात मिळालेल्या प्रेमामुळे आणि आदराने मलायका त्या घरातील मिळालेले स्वातंत्र्य आजही विसरलेली नाही. खान घराण्याची रिलेशनशिप निभवण्याची कलादेखील तीने पाहिलेल्या गोष्टीवरून पटते. करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ या शो मध्ये करन ला तिने या सर्व गोष्टी काही वर्षांपूर्वी सांगितल्या आणि तिचा व्हिडिओ अचानक पुन्हा व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओमधील तिचे शब्द लोकांच्या मनाला स्पर्शून गेले आहेत, कारण हा व्हिडिओ ती जेव्हा अरबाजपासून विभक्त झाली तेव्हाचा आहे. असे असूनही, खान कुटुंबावर तीचे इतके प्रेम आहे की ती आजही त्या आठवणी जपत आहे. मात्र, आता मलायका आणि अर्जुन कपूर यांचे एकमेकांशी दीर्घ संबंध टिकून आहेत.

मलायकाच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा ती पहिल्यांदा अरबाजच्या घरी गेली तेव्हा सर्वांनी तिचे खूप चांगले स्वागत केले. मलाइका म्हणाली की मी सोहेलला घराच्या छतावर डेनिम शॉर्ट्स आणि सोनेरी केसांमध्ये सूर्य प्रकाश घेत असताने बघितले होते. तेव्हा तीला वाटले की ते होते घर अगदी तिच्या मनासारखे मिळाले आहे.

पहिल्या दिवसापासून, खान परिवाराने माझे स्वागत केले

मलायका पुढे म्हणाली, ‘खरं सांगायचं तर, ते असं कुटूंब होत की ज्यांनी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही किंवा असं म्हटलं नाही की तू असं वाग पाहिजे किंवा अस राहिल पाहिजे, किंवा तू कोणत्याही निकषांचे पालन केले पाहिजे हे माझ्यासोबत कधीही घडले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांनी माझे मनापासून स्वागत केले.

मलायकाला पुन्हा त्याच घरात सून म्हणून जायचं आहे

मलायकाच्या मते खान कुटुंब खूप आधुनिक आहे आणि त्यांची पद्धतही खूप आधुनिक आहे. ती म्हणाली की ही सर्व वागणूक फक्त माझ्याबरोबरच नाही परंतु जो कोणी त्या घरात पाऊल टाकतो त्यालाही त्याच प्रकारची वागणूक दिली जाते. ती म्हणाली की जर तिने पुन्हा जन्म घेतला तर तिला त्याच घरात लग्न करायचं आहे. आणि त्या घरची सून बनून राहायचं आहे.

माझ्यावर कधीही दबाव नव्हता

आपल्या सासूविषयी मलायकाने हे देखील उघड केले की ती माझ्या कामाची खूप मोठी चाहती होती, ती म्हणाली की मला सासू ने कधीही दबाव आणला नाही आणि म्हणूनच मी माझे काम उत्तम प्रकारे केले. मलायका आणि अरबाज आता विभक्त झाले आहेत आणि दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *