राज कुंद्रा प्रकरण : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा, ‘मी भेटायला गेले तेव्हा ऑडिशनसाठी मला..’

बॉलीवूडमध्ये काही प्रकरण समोर आले की,अनेक दिवस सगळीकडेच त्याचाच चर्चा सुरु होतात. कोणतीही केस समोर आली आली की, नक्की काय कास घडलं आणि यामध्ये अजून कोना-कोणत्या स्टार्सची नाव आहेत,याची उत्सुकता सगळ्यांनाच असते.
त्यामुळे त्याबद्दल मीडिया आपले तर्क लावून बातम्या देतच असते. अनेक वेळा त्या खऱ्या असतात, तर काही वेळा त्यामध्ये कोणतेही तथ्य नसते. संभ्रम वाढू नये, म्हणून अशाप्रकारच्या केसमध्ये पोलीस देखील समोर आलेली माहिती वारंवार देत असतात. माघील काही दिवसांपासून सगळीकडेच एकाच केसची चर्चा सुरु आहे.
मात्र, अभिनेता उमेश कामात यांनी त्वरित यावर एक्शन घेऊन आपले नाव ख’राब होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. त्यानंतर एका अभिनेत्रींच्या खुलास्याने मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव पुढे आले. राज कुंद्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या एका सिनेमासाठी तिची निवड करण्यात आली असून, ती लवकरच त्यांच्यासोबत काम करणार होती असा, खुलासा त्या अभिनेत्रीने सई ताम्हनकरबद्दल केला होता.
मात्र, राज कुंद्रा यांच्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये मी कधीही गेले नाही किंबहुना मला तशी ऑफर कधीच आली नाही, असे स्पष्टीकरण सईने दिले होते. मात्र आता पुन्हा एकदा एका मराठी अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री मनीषा केळकरने राज कुंद्रासोबत आलेल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
‘राज कुंद्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नावं मी ऐकून होते. शिल्पा शेट्टीचे नाव सोबत असल्यामुळे साहजिकच त्या कंपनीची प्रतिष्ठा देखील होती. म्हणून जेव्हा राज कुंद्राची कंपनी नवीन सिनेमा बनवत आहे हे मला समजले तेव्हा मी माझे काही फो’टोज आणि अभिनयाचे व्हिडियोज त्यांच्या कंपनीला पाठवले.
माझी आणि त्यांच्या ऑफिस मधील काही लोकांची मिटिंग देखील झाली होती. त्यावेळी देखील त्यांनी मला काही वेगळे प्रश्न विचारले, म्हणून मला शंका आली. पुढे त्यांनी मला तुम्ही ऑडिशन देण्यास तैयार आहेत का, असा सवाल केला. त्यावेळी नक्की कोणता सिन करायचा आहे, किंवा कोणता लूक तुम्हाला ऑडिशन साठी हवा आहे असे अगदी बेसिक प्रश्न मी त्यांना विचारले.
मात्र त्यावर त्यांनी गोलमोल उत्तर दिले, आणि त्यानंतर त्यांनी कधीच मला फोन नाही केला. माझ्या प्रश्नांवरुनच त्यांना समजले असावे की, मी असे सिनेमा करणार नाही. आणि म्हणून त्यांच्या ऑफिस मधून पुन्हा कधीच मला कोणी संपर्क केला नाही आणि मीदेखील त्यांना संपर्क केला नाही.’ असे मनीषा केळकर हिने सांगितले आहे. मात्र तिने सांगितलेल्या या अनुभवामुळे पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील राज कुंद्राचे धागेदोरे होते का?