मराठी सिनेविश्वातील ‘हे’ होते ‘धक्कादायक’ घटस्फोट, 3 नंबर जोडी होती पूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट

मराठी सिनेविश्वातील ‘हे’ होते ‘धक्कादायक’ घटस्फोट, 3 नंबर जोडी होती पूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार हे एकत्र काम करतात. तसेच मालिकांमध्ये देखील त्यांना काम करण्याची संधी मिळते. अशावेळेस अभिनेता व अभिनेत्रींमध्ये एकत्र राहिल्यामुळे प्रेम संबंध निर्माण होतात. त्यानंतर ते आपसुकच लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलावंत आहेत की ज्यांनी काही वर्षातच लग्न करून नंतर घटस्फोट घेतला आहे.

यामध्ये आघाडीचे अभिनेते देखील आहेत. आम्ही या लेखांमध्ये आपल्याला अशाच अभिनेत्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.. चला तर मग जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार..

2. रेशम टिपणीस-संदेश कीर्तिकर: रेशम टिपणीस यांनी काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली आणि चित्रपटातून तिने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी तिने संजीव सेठ याच्यासोबत लग्न केले होते. त्यावेळी रेशम केवळ वीस वर्षाची तर संजीव 32 वर्षांचा होता. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली आता ती तेवीस वर्षाची आहे.

मात्र, असे असले तरी संदेश किर्तीकर सोबतरेशम चे नाव जोडले जाते. गेल्या वर्षी आलेल्या बिग बॉस मराठी सीजनमध्ये रेशम आणि राजेश शृंगारपुरे यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर संदेश आणि रेशम यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

3. शशांक केतकर-तेजश्री प्रधान: काही वर्षांपूर्वी झी मराठी या मालिकेवर होणार सून मी या घरची ही मालिका आली होती. या मालिकेला राज्यातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यात तेजश्री हिने साकारलेली जान्हवीची भूमिका प्रचंड गाजली होती. अनेक घरात तिला मुलीसारखा दर्जा देण्यात येत होता.

या मालिकेत तिच्यासोबतच शशांक केतकर याने देखील काम केले होते. सेटवर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले. मात्र, अवघ्या सहा महिन्यातच त्यांचा संसार मोडला. तेजश्री त्याला जुनिअर आर्टिस्ट म्हणून चिडवायची, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शशांकने घटस्फोट घेतल्याचे सांगण्यात येते.

4. स्वप्निल जोशी-अपर्णा जोशी: स्वप्निल जोशी हा मराठीतील आघाडीचा अभिनेता असून अकरावीत असताना स्वप्निल अपर्णा हिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी काही वर्षातच लग्न केले. मात्र, हा संसार केवळ चार वर्षे टिकू शकला. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर स्वप्नील याने लीना आराध्ये यांच्यासोबत 2011 मध्ये विवाह केला. ती औरंगाबाद येथील रहिवासी आहे.

5. पियुष रानडे-मयुरी वाघ: अभिनेता पियुष रानडे व मयुरी वाघ यांचे नाव सध्या चर्चेत आहे. मात्र, 2010 मध्ये पियुष याने टीव्ही अभिनेत्री शलमिका हिच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पियुषने मयुरीसोबत लग्न केले. मात्र, या दोघांचेही सध्या फारसे जमत नसल्याची चर्चा मराठी चित्रपट सृष्टीत आहे.

NEWS UPDATE

One thought on “मराठी सिनेविश्वातील ‘हे’ होते ‘धक्कादायक’ घटस्फोट, 3 नंबर जोडी होती पूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट

  1. अरे नाव व फोटो टाका ,मराठी ऍक्टर्स ना कोण एवढे ओळखते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *