सलमानचे ओझे बनून रहाणं आता मला शक्य नाही, मला स्वतःला काम शोधावं लागेल, पण मी आज जे आहे ते फक्त सलमान मुळेच

सलमानचे ओझे बनून रहाणं आता मला शक्य नाही, मला स्वतःला काम शोधावं लागेल, पण मी आज जे आहे ते फक्त सलमान मुळेच

सन 2010 मध्ये झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले होते, तर त्यांचा ‘हेट स्टोरी-3’ हा चित्रपटही चर्चेत होता. या चित्रपटातून झरीन खानची खरी ओळख पटली.

जरीन खान तिच्या क्यूट लुकसाठी चांगलीच परिचित आहे. अलीकडे झरीन खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये झरीन खान गुरु रंधवाच्या लगदी लाहौर दी गाण्यावर जबरदस्त स्टाईलमध्ये नाचताना दिसली. पटियाला सूटमधील झरीन खानचा पंजाबी डान्स खूप चांगला दिसत आहे.

झरीन पुढे म्हणाली, ‘मला सुरुवातीपासूनच बर्‍याच अडचणी आल्या. जेव्हा वीरला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा लोकांनी त्यासाठी मला जबाबदार धरले. त्यावेळी मी नवीन होते आणि इतकी परिपूर्ण नव्हते जितके इतर स्टार्स होते. कोणीही मला समजुन घेतले नाही. मी लोकांसाठी एक सॉफ्ट लक्ष्य बनले होते. त्या चित्रपटा नंतर मला काम मिळणे फारच अवघड वाटले होते.

झरीन खान पुढे म्हणते की, सलमानने माझं आयुष्य बदललं होतं, पण लोकांना वाटते की आता यापुढे देखील त्याच्यामुळेच मला आता काम मिळेल. हे चुकीचे आहे. सलमानने मला फक्त या उद्योगात प्रवेश दिला, त्यानंतर माझ्या मेहणीतीने आणि अभिनयातील चमकदार कामामुळे मला चांगले चित्रपट मिळत गेले. मी सलमानवर नेहमीच ओझे होऊ शकत नाही. माझ्याबाबत जेव्हा काहीही ठीक होत नव्हते तेव्हा सलमानने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पात्र ढिला मध्ये घेतले.

झरीन खानने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटातील तीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. पण तिच्या कारकीर्दीचा आलेख त्या पुढे प्रगती करू शकला नाही. आज बॉलिवूड चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री क्वचितच दिसत आहे. कदाचित यामुळेच या अभिनेत्रीने छोट्या पडद्याकडे वळली आहे. अभिनेत्री टीव्ही शो होस्ट करताना दिसणार आहे. एका मुलाखती दरम्यान तीने याचा तपशील शेअर केला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *