या कारणामुळे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी घटस्फोट घेतला जाणून घ्या..

मराठी मधील सर्वात लोकप्रिय मालिका”होणार सुन मी या घरची” या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावून सोडल होत. रोज संध्याकाळी घरोघरी ही मालिका पाहिली जायची. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोड़ीला विशेष पसंती मिळत होती.
याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात पोहचले. तेजश्रीचा ‘काहीही हा श्री’ या डायलॉगने तर सोशल मीडियावर अक्षरशः कहर केला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती.
मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने या अर्जात अस लिहल होत तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते.
वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिनवुन मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची फेसबुक फ्रेंड प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दूसरे लग्न केले. परंतु तेजश्रीने दुसऱ्या लग्नाबाबत अजुन काहीच विचार केला नाही.