..म्हणून घटस्फोट झाल्यानंतरही ह्रतिकसोबत राहतेय सुझान, ‘हे’ आहे त्यामागील कारण

..म्हणून घटस्फोट झाल्यानंतरही ह्रतिकसोबत राहतेय सुझान, ‘हे’ आहे त्यामागील कारण

2000 मध्ये राकेश रोशन यांचा मुलगा अशी ओळख असणाऱ्या हृतिक रोशन याचा कहो ना प्यार है हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्यावेळी एवढा हिट झाला की, हृतिकचे कोट्यावधी फॅन तयार झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने हृतिक रोशन याने बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

त्यानंतर त्याने कोई मिल गया, क्रिश आणि इतर चित्रपट केले. तसेच लक्षसारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट देखील त्याने केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने हृतिक रोशन याची ओळख बॉलिवूडला झाली. मात्र, यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे कहो ना प्यार है हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्याने लगेच आपली बालमैत्रिण सुझेन खान हिच्यासोबत लग्न केले.

सुझाननं पुढे लिहिलं, जेव्हा कोरोना आजाराचे गंभीर परिणाम समोर आले आणि हे रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले जाणार असल्याची घोषणा केली त्यावेळी मी आणि हृतिकनं ठरवलं होते की आम्ही या काळात आपल्या मुलांसोबत एकत्र राहायला पाहिजे.

त्यावेळी आम्ही या लॉकडाऊनमध्ये एका घरात राहायचा निर्णय घेतला आणि आमच्या लॉकडाऊनची सुरुवात केली. सुझान खानने या मुलाखतीत जे मुद्दे मांडले त्यावर तिला सोशल मीडियावरून पाठिंबा दिला जात आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सर्वजण सुझानचे कौतुक करत आहेत. या मुलाखतीत चाहत्यांसाठी तिने खास संदेश दिला आहे.

यात तिने लिहिले की, हा आपल्या सर्वांसाठी एक वेकअप कॉल आहे. ही अशी वेळ आहे ज्यात आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी आपलं बॉन्डिंग आणखी घट्ट करू शकतो. चांगल्या आठवणी तयार करू शकतो.

दोघेही चांगले मित्र..

हृतिक आणि सुझेन खान हे चांगले मित्र आहेत. तसेच लग्नानंतर देखील त्यांच्यामध्ये अजिबात वाद नव्हते. मात्र, हृतिक याचे बार्बरा मोरी हीच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. त्यानंतर सुझेन आणि हृतिक वेगळे राहू लागले.

काही वर्षांत दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुझेन खान हीचे देखील अर्जुन रामपाल याच्यासोबत नाव जोडले गेले. मात्र, असे असताना देखील दोघेही पुन्हा एकत्र राहताना दिसत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *