म्हणून अफजलखानाने आपल्या ६४ बायकांना यमसदनी पाठविले

म्हणून अफजलखानाने आपल्या ६४ बायकांना यमसदनी पाठविले

क्रूरकर्मा अफजलखान याचे नाव इतिहासामध्ये काळ्या अक्षरात लिहिल्या गेले आहे. या लेखामध्ये आपण त्याने आपल्या बायकांसोबत काय केले होते ते पाहूया.

छत्रपती शिवाजी महाराज याचे वाढते साम्राज्य पाहून त्यांना थांबविण्यासाठी आदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम सुलताना यांनी त्यांच्या सैन्यातील सरदारांना आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांचा सर्वात मोठा सरदार अफजल खान याने हसत हसत स्वीकारले व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.

त्यानुसार तो विजापूरहून निघाला. या वेळी त्याच्या सैन्यदलातील मोठा योद्धा असलेला हत्ती अचानकपणे मृत पावला. त्यामुळे त्याला गुरूने केलेले भाकीत सत्य होणार याची चाहूल लागली. जर सांगितल्याप्रमाणे आपण अपयशी ठरलो, तर आपल्या माघारी आपल्या ६४ बायकांचे काय होणार, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला.

त्यामुळे त्याने ६४ बायकांना जिवंत ठेवायचे नाही, असे ठरवले. त्यानुसार विजपुरपासून जवळच बावडी नावाची एक विहीर होती. त्याने सर्व बायकांना त्यात बुडवून मारले. त्यानंतर त्या जवळच त्यांचे दफन केले. आज त्या ठिकाणी एकूण ६४ कबरी आहेत. हा भाग आजही साठकबरी या नावाने ओळखल्या जातो.

अफझल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळ आहेत. एका चबुतऱ्यावर साठ समाध्या पाहतांना अनेकाचा काळजाचा ठोका चुकतो. अफजलखानाने बायका मारल्यानंतर यावर अनेक इतिहासतज्ञ यांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *