‘या’ कारणामुळे नाकारला होता आमिर खानने ‘सौदागर’.!

‘या’ कारणामुळे नाकारला होता आमिर खानने ‘सौदागर’.!

बॉलिवूडमध्ये खान बंधूंच्या त्रिकूटामध्ये आमिर खान हा सर्वाधिक उंचीच्या स्थानावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच शाहरुख खान आणि सलमान खान हे देखील बॉलीवूडच्या शिखरावर राहिलेले आहेत.

मात्र, आजघडीला शाहरुख खान हा बॉलिवूडमध्ये प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे, तर सलमान खान अजूनही बॉलिवूडमध्ये टिकून आहे. तर आमिर खान आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये दबा धरून आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये आमिरने 1991 तयार झालेला ‘सौदागर’ चित्रपट का नाकारला ते सांगणार आहोत.

मात्र, यातील विवेकच्या वाट्याला आलेली वासूची भूमिका ही आमिर खान ऑफर करण्यात आली होती. मात्र, आमीर खानने आपल्याला चित्रपटात न्याय मिळणार नाही, असे सांगत ही भूमिका नाकारली होती.

कालांतराने हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तसेच मनिषा कोईराला आणि विवेक रातोरात स्टार झाले होते. मात्र, आमीरला याने काही फरक पडला नाही. आज तो बॉलीवूडचा सर्वात आघाडीचा अभिनेता म्हणून गणला जातो.

मात्र, याउलट वासूची भूमिका करणारा विवेक मुश्राम बॉलीवूडमधून गायब झाला आहे. या भूमिकेबाबत आमीर म्हणतो, हा चित्रपट मी त्यावेळी नाकारला याचे कारण एवढेच होते या चित्रपटात मला अजिबात स्पेस नव्हता. बाकी काही कारण नव्हते. मात्र, मला याबाबत काहीही आक्षेप नाहीत.

‘साजन’, ‘हम आपके है कोन’ नाकारले होते

बॉलिवूडमध्ये अमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जातो. त्याला साजेशा भूमिका तो करत असतो. वर्षात केवळ एखादा चित्रपट तो करत असतो. यामुळेच त्याचे चित्रपट सर्वाधिक हिट ठरतात.

याआधी आमिर खानने साजन, हम आपके है कोन आणि यश चोप्रा यांच्या डर चित्रपटासाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र, या चित्रपटात अत्यंत छोटी भूमिका असल्याने त्याने तिन्ही चित्रपट नाकारले होते. हे चित्रपट प्रचंड हिट झाले होते. मात्र, भूमिका नाकारल्याचे शल्य आमिर खानच्या मनात आजही नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *