… म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त ‘पाच’ व-हाडी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या वयातही तरुण आणि स्टार अभिनेत्यांना लाजवतील अशी कामगिरी करतात. अमिताभ यांच्या लग्नाविषयी जाणून घेऊयात …
३ जून १९७३ रोजी बॉलिवूडची एक प्रसिद्ध जोडी विवाह बंधनात अडकली होती. ही जोडी आहे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची. येत्या ३ जूनला या दोघांच्या लग्नाचा ४७वा वाढदिवस आहे. दोघांनी देखील त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. पण दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास ढळू दिला नाही.
अमिताभ आणि जया यांचं लग्न काही शाही विवाहसोहळा वैगेरे असं पार पडलं नव्हतं. त्याचं झालं असं की, १९७३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ या चित्रपटात दोघांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट चांगला चालला तर सर्व टीम मिळून लंडनला फिरायला जाऊ असं ठरलं होतं. झालं ही तसंच चित्रपटला यश मिळालं.
अमिताभ आणि जया यांनी लंडनला जायची तयारी देखील केली. पंरतु अमिताभ यांच्या वडिलांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी लग्न न करत जया सोबत तू लंडनला जाऊ शकत नाही अशी ताकीदच त्यांना घातली. त्यामुळं अमिताभ आणि जया यांनी लगेच म्हणजेच पुढच्या २४ तासांत लग्न केलं.
त्यांच्या या लग्नाला घरातील मंडळी सोडून जेमतेम पाच व-हाडी हजर होते. बच्चन कुटुंबीय सतत लिंकअपच्या अफवांचा सामना करत आले आहेत. परंतु जया यांनी म्हटले की त्यांनी कधीच कोणत्या विषयावर अमिताभ यांना प्रश्न विचारले नाहीत.