…म्हणून ‘अमिताभ बच्चन’ यांनी मानले ‘सोनाली कुलकर्णीचे’ आभार..

…म्हणून ‘अमिताभ बच्चन’ यांनी मानले ‘सोनाली कुलकर्णीचे’ आभार..

सध्या कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण जग.अक्षरशः प्रलय अनुभवत आहे. जगातील आर्थिक सत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिका,इटली ,स्पेन यांसारख्या देशांनी सुद्धा कोरोनाच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येपुढे सर्व उपाय थकले असल्याची भावना निर्माण केली आहे.

भारतामध्ये सुद्धा रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याचे दिसत आहे. भारतामध्ये अद्यापही कोरणाग्रस्त बळींची संख्या दुपटी तिपटीने वाढत नसली तरीही ती खबरदारी घेतली गेली नाही तर अन्य युरोपीय देशांप्रमाणे भविष्यात आपल्यालासुद्धा मृत्युचे तांडव पहायला क्षणाचाही अवधी लागणार नाही.

विशेष म्हणजे या लघुपट चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दिसत आहे. ती रणबीरला अमिताभ बच्चन यांचा हरवलेला चष्मा शोधायला सांगते.

करोनाच्या निगेटिव्ह वातावरणात एखादी पॉझिटीव्ह गोष्ट घडल्यास कोणाला आनंद होणार नाही. अशीच एक छान गोष्ट मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिच्यासोबतही घडली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांनी स्वत:च्या हातानं लिहिलेलं पत्र सोनालीला पाठवलं आहे.


करोनाविरुद्ध सामना करण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे. देशातील नागरिक एकत्र येऊन लढा देत आहेत. असं असताना देशातील सिनेसृष्टीही एक असून सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या पाठिशी आहे, असं सांगण्यासाठी एक शॉर्टफिल्म तयार करण्यात आली आहे.

या शॉर्टफिल्ममध्ये अमिताभ यांच्यासहीत अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत. यात आपल्या मराठमोळ्या सोनालीचाही सहभाग आहे. ती रणबीरला अमिताभ बच्चन यांचा हरवलेला चष्मा शोधायला सांगते.

या लघुपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, गायक- अभिनेता दिलजीत दोसांज, तमिळ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत, मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटी, तेलगू सिनेमाचे स्टार चिरंजीवी, कन्नड सिनेमातील अभिनेते शिवा राजकुमार, बंगाली सिनेमातील नावाजलेला चेहरा प्रोसेनजीत चटर्जी यांचा सहभाग आहे.

‘फॅमिली’या शॉर्टफिल्ममध्ये काम केल्याबद्दल अमिताभ यांनी सोनालीचे आभार मानले आहेत. दरम्यान, सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोनालीनं अमिताभ यांनी स्वत:च्या हातानं लिहिलेल्या पत्राचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

‘अजून काय हवंय आयुष्यात.. महानायकाच्या हस्ताक्षरातील पत्र..’, असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेली ही शॉर्टफिल्म सध्या चर्चेचा विषय ठरत असून विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही कलाकार घरातून बाहेर पडले नाहीत.

प्रत्येकानं घरी राहून या शॉर्टफिल्मसाठी योगदान दिनं आहे. त्यामुळं घरात राहूनही सगळी कामं होऊ शकतात. बाहेर पडू नका असा संदेशही या शॉर्टफिल्ममध्ये देण्यात आला आहे. म्हणून लोकांना आता तरी खबरदारी घ्यावी आणि येणाऱ्या संकटाला गांभीर्याने घ्यावे अशी विनंती हे कलाकार करत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.