…..म्हणून ‘पद्मावत’ चित्रपटात विकी कौशलसोबत काम करण्यास दीपिकाने दिला होता नकार , कारण वाचून व्हाल थक्क…

…..म्हणून ‘पद्मावत’ चित्रपटात विकी कौशलसोबत काम करण्यास दीपिकाने दिला होता नकार , कारण वाचून व्हाल थक्क…

दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री आहे. आजवर तिने केलेले चित्रपट आणि साकारलेल्या भूमिका या कौतुकास्पद आहेत. ओम शांती ओम हा चित्रपट तिने बॉलिवूडच्या किंग खानसोबत म्हणजेच शाहरुखसोबत केला होता. त्यानंतर दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत तिने तिच्या अभिनयाची ओळख करून दिल.

विकी कौशलसोबत ती एका सुपरहिट सिनेमामध्ये दिसणार होती. पण, विकीसोबत काम करण्य़ास दीपिकाने नकार दिला होता. जाणून घ्या कोणता होता तो सुपरहिट सिनेमा आणि काय होते नकारामागचे कारण.

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी दीपिका ही अभिनेत्री आहे. मागिल वर्षी तिचं लग्न झालं रणवीर सिंगसोबत. रणवीरदेखील तितकाच टॅलेंटेड आणि जबरदस्त हिरो आहे. या दोघांनी भन्साळींच्या तीन चित्रपटांत एकत्र काम करत विक्रमच मोडला होता. तिन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. रामलीला, बाजीराव मस्तानी आणि त्यानंतर ‘पद्मावत’ हे तिन्ही चित्रपट दोघांनी एकत्र केले. रणवीर यामध्ये दीपिकाच्या विरोधी आणि नकारात्मक भूमिकेत दिसला. त्यामुळे मुख्य भूमिकेतील राजासाठी भन्साळी यांना एका नवीन चेहऱ्याला संधी द्यायली होती आणि ती म्हणजे विकी कौशल.

त्यावेळी विकीचा ‘मसान’ प्रदर्शित झाला होता आणि सर्वच स्थरातून त्याच्या अभिनयाचे कौतुक होत होते. संजय लीला भन्साळी यांनीही त्याचा परफॉर्मनम्स पाहिला होता आणि राजा रतनसिंगसाठी त्यांनी विकीला निवडले होते. भन्साळी यांनी विकीला या रोलसाठी विचारणाही केली होती. विकीने या रोलसाठी ऑडिशनही दिले होते. विकी यासाठी आनंदीही होता कारण, नव्या कलाकाराला भन्साळींच्या चित्रपटात काम मिळणे ही मोठी बाब आहे.

पण, विकीला हा चित्रपट मिळाला नाही तो दीपिकामुळे. विकी या चित्रपटामध्ये असल्यास काम करण्यास तिने नकार दिला होता. या रोलसाठी आणि सिनेमासाठी दीपिकाला कोणीतरी ए लिस्टमधील अभिनेता अपेक्षित होता. त्यामुळे विकीला घेण्याचा निर्णय भन्साळी य़ांनी मागे घेतला.

पण, आता मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर विकीदेखील टॉपला पोहोचला आहे. त्यानंतर विकी आणि दीपिका एका अॅडमध्ये एकत्र दिसले. लस्ट स्टोरी, राझी, उरी असे सुपरहिट सिनेमे त्याने केले. दीपिकाचा नुकताच ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *