‘…म्हणून मी ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो नाही’

‘…म्हणून मी ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो नाही’

बुधवारी इरफान खान आणि गुरवारी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. मुंबईच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६७व्या वर्षी त्याचं निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते.

रुग्णालयात डॉक्टरांनी शेवटपर्यंत त्यांच्यासाठी प्रयत्न केले मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना त्यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे.

शिवाय ते असे कलाकार होते, त्यांना सतत नवीन गोष्टी जाणून घ्यायची फार इच्छा असायची. त्याचा आत्मविश्वास देखील तितकाच प्रबळ होता. ऋषी कपूर यांचा असा उल्लेख त्यांनी या ब्लॉगमध्ये केला आहे. यासर्व गोष्टीं पलिकडे जावून त्यांनी एक मोठं स्पष्टीकरण यावेळेस केलं आहे.

या ब्लॉगमध्ये त्यांनी असं देखील नमूद केलं आहे की ते कधीच ऋषी कपूर यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेले नव्हते. कारण ते एका उत्साही चेहऱ्यामागील निराशा पाहू इच्छित नव्हते. बिग बींनी शेवटी म्हटले आहे की, जेव्हा ऋषी आपल्याला सोडून गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू नक्कीच असेल…

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *