या कारणांमुळे सलमानचे एकही रिलेशनशिप्स टिकत नाही, स्वतः वडील सलीम खान यांनीच केला खुलासा…

बॉलिवूड मध्ये सर्वाधिक विचारला जाणार प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार? महत्वाचं म्हणजे सलमान खान कुणाशी लग्न करणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनसोबत सलमान खानचे नाव जोडले गेले आहे.
त्यात त्याच सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे ऐश्वर्यासोबत असलेलं. हम दिल दे चुके सनम पासून यांचं प्रेम प्रकरण सुरू झाले होते. सर्वांना वाटत होते की सलमान खान आणि ऐश्वर्या राय लग्न करतील पण होत्याच नव्हतं झालं आणि यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला. या नंतर काय झाले हे आपण सर्वाना माहिती आहे.
त्याच्या या अपयशी रिलेशनशिप्समागील खरं कारण त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच मै’ या टॉक शोमध्ये त्यांनी २००९ मध्ये हजेरी लावली होती. आणि या शोमध्येच त्यांनी याचा खुलासा केला होता.
या शोमध्ये सलीम खान म्हणाले होते की, “एखाद्या अभिनेत्रीवर एखाद्या अभिनेत्याचे प्रेम येते. कारण एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांना जास्तवेळ सोबत घालवावा लागतो. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतच राहतात. पण त्यानंतर तो त्या व्यक्तीमध्ये स्वतः च्या आईला शोधू लागतो आणि ती त्याला सापडत नाही. आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यातील एकही रिलेशनशिप याच कारणामुळे टिकत नाहीत”