ऐश्वर्या रायला न सांगता ‘या’ अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, आणि इथूनच त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली? आणि ब्रेकअप झाला

ऐश्वर्या रायला न सांगता ‘या’ अभिनेत्रीला परदेशात भेटायला गेला होता सलमान खान, आणि इथूनच त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली? आणि ब्रेकअप झाला

सलमान खान आणि ऐश्वर्या एकेकाळी बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय कपल होते. बॉलीवूड मध्ये सर्वत्र त्यांचीच चर्चा असायची. सर्वांना वाटत होते की सलमान आणि ऐश्वर्या पुढे लग्न करतील, पण झाले ते याच्या विपरीत. त्यांचा ब्रेकअप झाला आणि आज ते एकमेकांचे तोंड सुद्दा बघत नाही. पण सर्व सुरळीत असताना हे काही विनाकारण झाले नाही.

कारण सलमान ऐश्वर्या वर जीवापाड प्रेम करत होता आणि आजही तो फक्त तिच्या मुळेच अविवाहित आहे असे म्हटले जाते. नेमके झाले असे की, ऐश्वर्या आधी सलमानची एक गर्लफ्रेंड होती जीच नाव सोमी अली असे होते. यांचे एकेकाळी अफेअर होते.

सलमानने २०१२ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्याच्या घरासमोर ते प्रकरण त्या दिवशी घडले हे खरे आहे. पण मीडियाने अनेक गोष्टी वाढवून लिहिल्या. एखाद्या नात्यात असताना तुमची एकमेकांसोबत भांडणं ही होतात. मी आणि ऐश्वर्या देखील नात्यात होतो.

त्यामुळेच आमच्यात त्या दिवशी काही खटके उडाले होते. तिचे घरातले लोक अतिशय चांगले आहेत. माझ्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या गोष्टींमुळे ते ऐश्वर्याला मला भेटण्यापासून थांबवत होते आणि त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाहीये.

सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर सुरू असताना सलमान तिला न सांगता सोमीला आर्थिक मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी तिला पैशांची गरज होती. पण ही गोष्ट त्याने ऐश्वर्याला सांगितली नव्हती. यामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती असे वृत्त स्टारडस्टने दिले होते.

त्यानंतर काहीच महिन्यात त्यांचे ब्रेकअप झाले होते. तिने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या दारुच्या सवयीला मी कंटाळले होते. दारूच्या नशेत तो अनेकवेळा भांडायचा, याच गोष्टीमुळे मी ब्रेकअप करण्याचे ठरवले.

या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सलमानसोबत काम न करण्याचा ऐश्वर्याने निर्णय घेतला आणि आजवर त्यांनी कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *