म्हणून सलमान खान त्याच्या घरी पार्टी असली की नवाझुद्दीन सिद्दीकाला बोलवत नाही, कारण वाचून धक्का बसेल

म्हणून सलमान खान त्याच्या घरी पार्टी असली की नवाझुद्दीन सिद्दीकाला बोलवत नाही, कारण वाचून धक्का बसेल

नवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.

सलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कधीच नवाझला बोलवत नाही आणि यामागे एक खास कारण असल्याचे सलमाननेच त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.

कोणामध्येही मिसळत नसे. यावरून नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आले आणि त्याचमुळे सलमानने त्याला पार्टींसाठी निमंत्रण देणेच आता बंद केले आहे.

नवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नाहीये. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते.

त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये झळकलेला आहे. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *