‘या’ कारणामुळे शोएबसोबत लग्न केलं, सानिया मिर्झाने केला खुलासा, वाचा सविस्तर

सानिया मिर्झा भारतीय टेनिस मधील सर्वोच्च नाव म्हटले तर वावगे ठरू नाही. सानिया मिर्झाने आजवर अनेक पराक्रम केले आहेत. सानिया मिर्झा कोर्टवर ज्याप्रमाणे वावरते त्याचप्रमाणे ती खेळातही चमकदार कामगिरी दाखवते. सानिया मिर्झा आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी देखील खूप प्रसिद्ध आहे.
तिची राहणी, टेनिस कोर्टवर येण्याची पद्धत, हाफ स्कर्ट आणि एकूणच सानिया मिर्झा हिचा टेनिस कोर्टवरचा खेळ अतिशय कौतुकास्पद असतो. तिच्या कपड्यामुळे ती अतिशय चर्चेत असते. अनेकदा मुस्लिम संघटनांनी तिच्या कपड्यावरून फतवे काढले होते. मात्र, तिने याला देखील खूप चोख उत्तर दिले होते.
अनेक संघटनांनी हे वाद उकरून काढले होते. सानिया मिर्झा बराच काळ भारतात राहते. शोएबसोबत लग्न केले म्हणून सानियावर टीकादेखील खूप झाली. ती आता भारतातून खेळणार की पाकिस्तानकडून खेळणार, असे देखील बोलले जात होते. त्यावर सानिया मिर्झा हिने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला की, आपण जन्माने भारतीय आहोत आणि मरेपर्यंत भारतीय राहणार आहोत.
तसेच आपण केवळ भारताकडूनच टेनिस खेळणार आहोत, असे तिने सांगितले होते. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता. 2010 मध्ये सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. एका मुलाखतीत सानिया मिर्झा म्हणाली की, शोएब मलिक आणि माझी सुरुवातीला भेट झाली. त्यानंतर आम्ही चार वर्षे एकमेकांना डेट केले.
मात्र, त्यानंतर शोएबने मला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्याच्यामधील साधेपणा मला खूप भावला. त्यानंतर मी त्याला लगेच लग्नासाठी हो म्हणले. आमच्यात चांगला संसार सुरू असून कोणताही वाद नसल्याचे देखील तिने सांगितले. मलिक आणि सानिया मिर्झा यांना एक मुलगा आहे.
या कारणामुळे येतो शोएब मलिकचा राग..
सानिया मिर्झा हिचा स्वभाव मुळात हा गप्पागोष्टी करण्याचा आहे. शोएब मात्र उलट अधिक आहे, तो जास्त काही बोलत नसतो. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक अनेकदा गप्पा मारत बसत असतात. मात्र, अधिक सानिया मिर्झा बोलत असते. त्यामुळे सानिया मिर्झाला प्रचंड रागवत सानिया किती जरी रागावली तरी तो काहीही बोलत नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.