पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिरला IPLमध्ये आपल्या संघात घेण्यासाठी ‘या’ ३ संघामध्ये चढाओढ ! लागू शकते करोडोंची बोली..

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिरला IPLमध्ये आपल्या संघात घेण्यासाठी ‘या’ ३ संघामध्ये चढाओढ ! लागू शकते करोडोंची बोली..

माघील एका दशकापासून, पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाही. पाकिस्तानी खेळाडूंना काही कारणास्तव आयपीएल खेळण्यापासून बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे एक दशकाहून अधिक काळ झाला असेल पण, आयपीएलमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू खेळला नाहीये. पाकिस्तानच्या संघामध्ये काही उत्तम खेळाडू आहेत, पण आयपीएल मध्ये त्यांची आठवण येत नाही.

पण आयपीएलमध्ये खेळता आलं पाहिजे, अशी इच्छा अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी बोलून दाखवली आहे. आता एका पाकिस्तानी खेळाडूची आयपीएलमध्ये वर्दी लागण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (mohammad amir) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत मोठा खुलासा केला आहे.

पंजाब किंग्न्सची माघील काही वर्षातील कामगिरी बघितली तर संघाने उत्तमच कामगिरी केली आहे. पण संघामध्ये परदेशी गोलंदाजांची कमतरता असल्याचे अनेकवेळा जाणवले आहे. या वर्षीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल तर गोलंदाजासोबत देखील संघ गडगडताना दिसला. अशा परिस्थितीत पंजाब किंग्स हि अडचण दूर करण्याच्या नक्कीच विचारात असेल.

येणाऱ्या हंगामाकरिता ते कोणत्यातरी मोठ्या आणि मजबूत खेळाडूला आपल्या संघात घेण्याचा विचार ते करत आहेत. यावर्षी संघाने IPL २०२१ च्या मेगा लिलावामध्ये रिचर्डसनवर विश्वास दाखवला होता आणि १४ कोटी रुपयांना रिचर्डसनला विकत घेतले होते. पण त्यानंतर देखील संघातील गोलंदाजीचा प्रश्न तसाच आहे. त्याला केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळाली.

पण या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने १०.६३ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत केवळ ३ विकेट घेतल्या. म्हणून त्याच्या कामिगिरीबद्दल बोलायचे झालेच तर संघाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हती. म्हणून मोहम्मद आमीरची(mohammad amir) संघाला चांगलीच गरज आहे. तर दुसरीकडे सीएसके संघात गोलंदाज म्हणून फक्त सौर लुंगी नगिडी आहे. सीएसके मध्ये लुंगी हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

त्याची कामगिरी संघासाठी खूप विशेष नव्हती. यावर्षी संघाने देखील त्याला फक्त ३ सामन्यातच खेळण्याची संधी देण्यात आली होती. या तीन सामन्यांमध्ये त्याने १०.४१ च्या दराने धावा खर्च करत केवळ ३ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. म्हणून सीएसकेला देखील एका उत्तम गोलंदाजांची आवश्यकता आहे.

सनरायझर्स च्या संघात गोलंदाजांची कमतरता नाही. मात्र हा संघ आपल्या उत्तम गोलंदाजीसाठीच ओळखला जातो. त्यामुळे आता हे तिन्ही संघ मोहम्मद आमीरला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यास तैयार असतील हे नक्की.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.