COVID-19 : ‘मुक्त बर्वेने’ शेअर केला थरकाप उडवणारा ‘VIDEO’ म्हणाली, इटली भारताचा ‘भविष्यकाळ’?

सध्या कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण जग.अक्षरशः प्रलय अनुभवत आहे. जगातील आर्थिक सत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिका, इटली, स्पेन यांसारख्या देशांनी सुद्धा कोरोनाच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येपुढे सर्व उपाय थकले असल्याची भावना निर्माण केली आहे. भारतामध्ये सुद्धा रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याचे दिसत आहे.
भारतामध्ये अद्यापही कोरणाग्रस्त बळींची संख्या दुपटी तिपटीने वाढत नसली तरीही ती खबरदारी घेतली गेली नाही तर अन्य युरोपीय देशांप्रमाणे भविष्यात आपल्यालासुद्धा मृत्युचे तांडव पहायला क्षणाचाही अवधी लागणार नाही याची जाणीव प्रसारमाध्यमे व निरनिराळ्या सेलिब्रेटिं कडून करून दिली जात आहे. भारतामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वसामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रेटिंपर्यंत सर्वजण चिंतेमध्ये आहेत व आपापल्यापरीने जनजागृती करत आहे.
एकी कडे सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत तर दुसरीकडे साधा फ्लू तर आहे असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत. या पत्रामध्ये मेलँड्री यांनी इटलीमध्ये वर्तमानात जी परिस्थिती कोरोना संक्रमणामुळे निर्माण झाली आहे तीच परिस्थिती अन्य देशांमध्ये हलगर्जीपणामुळे निर्माण होऊ शकते, मोठ्या प्रमाणात आर्थिक दुही माजू शकते.
मानसिक आरोग्य व एकंदरीतच समाजव्यवस्थेवर लॉक डाउन संपल्यानंतर किती मोठा परिणाम होऊ शकतो हे या पत्रामध्ये व्यक्त केले आहे. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे या जागतिक महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे हा या पत्राचा सारांश आहे. लॉक डाऊन मुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येऊ शकते.
लाँकडाऊन नंतर विभक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकते अशी भीती सुद्धा या पत्रामध्ये व्यक्त केली आहे .एकमेकांना उभारी देण्यासाठी आपण पण प्रयत्न केले पाहिजे व सरकारने ज्या काही नियमावली तयार केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे .अन्यथा इटलीमध्ये रोज हजारोंच्या संख्येने कोरोनामुळे बळी जात आहेत ते वर्तमान हे भारत व अन्य देशांचा भविष्य काळ असू शकतो असा इशारा सुद्धा दिला आहे.