घरात ‘चार मुली’ जन्मल्या म्हणून दुःखी होते वडील; आज त्याच करतात बॉलिवूडवर राज, एक आहे प्रसिद्ध डान्स ‘शो’ची जज

पहिली बेटी धनाची पेटी, अशी आपल्याकडे म्हण खूप दिवसापासून प्रचलित आहे. मात्र, अनेकांना वंशाचा दिवा हवा असल्याने मुली नको, असे म्हणणारे महाभाग आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात सापडतात. अनेकदा मुलीचा गर्भातच जीव घेण्यात येतो.
असे अनेक प्रकार आपल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळतात किंवा मुलगाच हवा या हट्टापायी मुलीचा देखील छळ करण्यात येतो. गेल्या काही वर्षापासून सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यापासून याबाबत डॉक्टर देखील अधिक सजग झाले आहेत.
3. मुक्ती मोहन: मुक्ती मोहन देखील मोठ्या बहिणीप्रमाणे बॉलीवूडमध्ये आपला जम बसवत असून ती मोठ्या बहिणीप्रमाणे डान्सिंग क्लास घेत असून कोरिओग्राफर देखील अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. आणि शो मध्ये देखील ती काम करत असल्याचे सांगण्यात येते.
4.कीर्ती मोहन : ही तिन्ही बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिने या क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावले आहे. वडिलांची ती आवडती आहे. तसेच आगामी काळात मोठे प्रोजेक्ट आपल्या हातावर असल्याचे तिने सांगितले.
तर या आहेत त्या चार मुली. ब्रिज मोहन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्याला सुरुवातीला चार मुली झाल्याचे दुःख वाटत होते.
मात्र, आजच्या परिस्थितीत चारीही मुलींनी खूप काम केले असून त्यांनी प्रचंड नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. मुलगा नसल्याचे थोडे देखील शल्य आपल्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.