नाना पाटेकर यांच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ अभिनेत्री… सोडले होते अन्नपाणी…

नाना पाटेकर यांच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ अभिनेत्री… सोडले होते अन्नपाणी…

नाना पाटेकर बॉलीवूडला पडलेले एक सहज सुंदर स्वप्न. मराठमोळा असणारा हा चेहरा सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेला आहे. अतिशय काटक शरीरयष्टी, दिसायला फारसे चांगले नाही. तरी आपल्या अभिनयाने त्यांनी बॉलीवूडवर छाप सोडली होती. मराठीमध्ये त्यांनी काही जबरदस्त हिट चित्रपट दिले. नंतर ते हिंदी चित्रपटसृष्टी कडे वळाले.

तिरंगा, प्रहार, क्रांतिवीर यासारखे देश क्रांतिकारी चित्रपट केल्याने ते देशभरात पोहोचले. त्यानंतर बॉलिवूडला त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. काही वर्षांपूर्वी आलेला अपहरण हा चित्रपट प्रचंड चालला होता. उत्तर प्रदेशातील बाहुबली नेत्याची भूमिका त्यांनी साकारली होती. या चित्रपटाला पुरस्कार देखील मिळाले होते. विशेष करून नाना पाटेकर यांची प्रहार’मध्ये भूमिका खूप गाजली होती.

या चित्रपटात नाना पाटेकर यांच्या सोबत अभिनेत्री मनिषा कोईराला दिसली होती. त्यावेळी या दोघांच्या जोडीची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर या दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी चित्रपटात देखील काम केले होते. हा चित्रपट चालला होता. मात्र, दोघांची चर्चा खामोशी पेक्षा अग्निसाक्षी या चित्रपटामुळे झाली.

या दोघांमध्ये चित्रपटादरम्यान जवळीक निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलिमा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचेही बोलले जात होते. मात्र, याबाबत दोघांनीही कधीही खुलासा केला नाही.1996 सली अग्निसाक्षी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात नाना पाटेकर एका व्यावसायिकाच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते.

जे आपल्या पत्नीला मनापासून प्रेम करत होते. मात्र कडक स्वभावामुळे त्यांची पत्नी त्यांना घाबरत असल्याचे दाखविण्यात आले होते. नाना पाटेकर यांच्या आईचा मृत्यू ज्या कारणाने झाला तेच कारण मनिषा कोईराला चित्रपटात करत असल्याने त्यांचा संताप होत होता. एका अपघातात मृत्यू झाल्याचे समजून मनिषा कोईराला चित्रपटात जॅकी श्रॉफ यांच्या सोबत लग्न करते.

मात्र, कालांतराने नाना पाटेकर पुन्हा वापस येतो, असे या चित्रपटाचे कथा कन आहे. चित्रपटात जरी कडक भूमिका नाना पाटेकरने केली असली तरी चित्रपटाच्या बाहेर मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचे प्रेम संबंध चांगलेच चर्चेत आले होते. एक वेळ अशी आली होती की मनिषा कोईराला त्यांच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती.

तिने अन्न पाणी देखील सोडले होते. मात्र, कालांतराने या दोघांचे संबंध संपुष्टात आले. त्यानंतर 2010 मध्ये मनिषा कोईराला हिने नेपाळी उद्योगपतीशी लग्न केले. मात्र, काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मनिषा कोईराला हिला कॅन्सर देखील झाला होता. मात्र, आता ती यातूनही सावरली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *