नवऱ्यापेक्षा जास्त कमवतात ‘या’ अभिनेत्र्या, दीपिकाची कमाई जाणून तर हैराण व्हाल !

बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता की अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा कमी लेखले जायचे. कालांतराने काही अभिनेत्री याला अपवाद ठरल्या. त्यांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या बरोबरीने आपला अभिनय सादर केला आणि त्यांना प्रेक्षकांची दाद मिळाली.
त्यामुळे आता देखील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाने चित्रपट हिट करू शकतात. त्यात काही अभिनेत्रींना मुख्य काळकरांपेक्षाही जास्त मानधन मिळते. म्हणून आज आपण अशा अभिनेत्रींनबद्दल बोलणार आहोत हे कमाईच्या बाबतीत आपल्या नवऱ्या मागे टाकतात.
बिपाशा बसु :- सद्या बिपाशाचे चित्रपट येत नसले तरी ती एकेकाळी प्रसिद्धी अभिनेत्री होती आणि आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही त्यामुळे आजही कमाईच्या बाबतीत बिपाशा बसू कोणापेक्षाही कमी नाही.
बिपाशाने 2016 मध्ये करणं सिंग ग्रोवरसोबत लग्न केले होते. आणि विशेष बाब म्हणजे करणं बिपाशा पेक्षा वयाने लहान आहे. आजही बिपाशा बॉलिवूड मधील हॉटअभिनेत्रींपैकी एक आहे. बिपाशा 100 कोटींची मालकीण आहे. बिपाशाची कमाई तिच्या पतीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.
सोहा आहे खान :- सोहा अली खान भलेहि आपल्याला कमी चित्रपटात दिसली असले पण कमाईच्या बाबतीत ती कोणत्याही इतर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. इतके नाही तर कमाईच्या बाबतीत ती आपल्या पतीला देखील मागे टाकते. सोहा शर्मिला टागोरची मुलगी आणि अभिनेता सैफ अली खानची बहिण आहे.
सैफचे खानदान नवाबांचे खानदान आहे, ज्यांची स्वतःची रियासत होती. त्यांचा अलिशान राजवाडा आजही आहे. सोहा आपल्या आपल्या पूर्वजांची संपत्ती सांभाळते त्यामुळे तिचा पती कुणाल खेमी कमाईच्या बाबतीत कुठेच लागत नाही.
ऐश्वर्या राय बच्चन :- ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी कमाईच्या बाबतीत आपला पती अभिषेक बच्चन पेक्षा जास्त कमाई करते. विश्व सुंदरीचा किताब मिळवलेली ऐश्वर्या राय अभिनयामध्ये देखील मागे नाही. ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अमिताभ बच्चनचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले होते.
अभिषेक बच्चन भलेहि बॉलीवूडमध्ये सफल होऊ शकला नाही पण ऐश्वर्यासोबत असे झाले नाही. ती तिच्या काळामधील एक हाइएस्ट पेड अभिनेत्री राहिली आहे. ती बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सूत्रांनुसार अभिनेत्री ऐश्वर्या रायजवळ ३० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. बच्चन परिवारातील ती अमिताभ बच्चननंतर सर्वाधिक कमाई करणारी सदस्य आहे
दीपिका पदुकोण :- दीपिका पादुकोणने आपल्या करियरची सुरवात शाहरुख खानच्या ओम शांति ओम चित्रपटामधून केली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दीपिका आज बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट हिट करण्याची क्षमता तिच्यात आहे. दीपिका आणि रणवीर सिंहने २०१८ मध्ये लग्न केले होते.
विशेष बाब म्हणजे दीपिका बॉलीवूडमध्ये रणवीर सिंहपेक्षा तीन वर्षाने सिनियर आहे. कारण ती रणवीरच्या आधीपासून बॉलीवूडमध्ये काम करते. तर पती रणवीरने २०१० मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटामधून डेब्यू केला होता. दीपिका आपला पती रणवीर सिंह पेक्षा कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत खूपच पुढे आहे.