परिवाराने सोडली साथ, उपचारासाठी नाहीत पैसे, सचिन पिळगावकरांसोबत काम करणाऱ्या या दिगग्ज अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था..

परिवाराने सोडली साथ, उपचारासाठी नाहीत पैसे, सचिन पिळगावकरांसोबत काम करणाऱ्या या दिगग्ज अभिनेत्रीची झालीय बिकट अवस्था..

बॉलीवूड हे क्षेत्र असे आहे की, तिथे मृगजळ या मागे धावणारे लोक अनेक असतात. ज्याची चलती आहे, त्याला बॉलिवूडमध्ये भाव असतो. एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपट करणे सोडले किंवा त्याला चित्रपट मिळत नसतील, तर त्याला कालांतराने कोणीही विचारत नाही.

याबाबत दिग्गज अभिनेते रझा मुराद यांनी अनेकदा ही खदखद व्यक्त करून सांगितले आहे. रजा मुराद यांच्या बाबतीत आर्थिक अडचणीचा प्रश्न नाही. मात्र, त्यांना ही खंत नेहमी आहे की, जोपर्यंत तुमची बॉलिवूडमध्ये चालती आहे, तोपर्यंत तुम्हाला या क्षेत्रामध्ये विचारण्यात येते. नाही तर नंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही.

त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने मदतीचा हात दिला होता. सविता बजाज यांना देखील को’रोना म’हामा’रीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. या वयात त्यांना काम भेटत नाही आणि आर्थिक मदत देणारे देखील कमी झाले आहेत.

तसेच त्यांच्याकडे असलेली सगळी संपत्ती संपलेली आहे. त्यामुळे देखील त्यांना उदरनिर्वाहासाठी अडचणी येतात. सविता बजाज यांनी नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा या सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याचप्रमाणे नुक्कड, मायका, कवच यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सविता बजाज यांच्या बाबतीत एक वृत्त नुकतेच व्हायरल झाले आहे. यामध्ये सविता बजाज म्हणतात की, माझ्याकडे जमा असलेली सर्व रक्कम आता संपली आहे. त्यामुळे मला उदरनिर्वाह करण्यासाठी अवघड जात आहे. याबाबत मी अनेकांना सांगितले. त्यानंतर मला सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट संघटनेकडून कडून महिन्याला दोन हजार रुपये खर्च करण्यासाठी देण्यात येतात.

तसेच रायटर असोसिएशन यांच्याकडून देखील आपल्याला पाच हजार रुपये मिळतात, असेही तिने सांगितले. मला माझ्या मूळ गावी म्हणजेच दिल्लीला जायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्यावर आता अशी वेळ आली आहे.

मलाही मदत मिळते. मात्र, ते पैसे देखील पुरेसे नाहीत. कारण मला उपचारासाठी खूप पैसे लागतात. त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी मला आर्थिक मदत द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. वृद्धापकाळामुळे आता मी काम देखील करू शकत नाही, असेही त्यांनी रडत रडत सांगितले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.