चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेची पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसायला आहे अतिशय सुंदर, पाहा तिचे फोटो

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेची पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसायला आहे अतिशय सुंदर, पाहा तिचे फोटो

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांचा आवडता आहे. केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसिद्ध असून मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेकांनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

या कार्यक्रमाद्वारे कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, निलेश साबळे लोकांचे मनोरंजन करतात.

पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळेच मिळाली. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने ‘चला हवा येऊ द्या’ शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत. निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.

निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

निलेश आज मोठा स्टार असला तरी तो इतर अभिनेत्यांप्रमाणे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नसतो. त्याच्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. निलेशविषयी आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत.

निलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झालेले असून त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. निलेशच्या स्ट्रगलिंगच्या काळातही ती खंबीरपणे त्याच्यामागे उभी राहिली होती.

NEWS UPDATE

One thought on “चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेची पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसायला आहे अतिशय सुंदर, पाहा तिचे फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *