नितु कपूर नाही तर हे होत ऋषी कपूर यांचं पहिलं प्रेम.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी नुकतेच मुंबई येथे निधन झाले आहे. आपल्या सदाबहार आयुष्यामध्ये ऋषी कपूर अतिशय भरभरून जगले आहेत. त्यांच्या आयुष्याविषयी आम्ही आपल्याला काही किस्से सांगणार आहोत.
कपूर खानदान बॉलीवूडमध्ये सर्वाधिक दबदबा असणारे कुटुंब आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर त्यानंतर रणधीर कपूर, ऋषी कपूर राजीव कपूर आणि आता रणबीर कपूर बॉलिवूड गाजवत आहेत. यामध्ये ऋषी कपूर यांची कारकीर्द खूप गाजली होती.
काही मासिकांमध्ये याबाबत बातम्या देखील छापून आल्या. याचा परिणाम म्हणजेच यास्मिन आणि ऋषी यांचे नाते तुटले. ऋषी यांनी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर ऋषी यांनी नीतू सिंह यांच्यासोबत काही चित्रपटात एकत्रित काम केले.
कभी कभी या चित्रपटात नीतू सिंग यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांच्याकडे बारूद नावाचा चित्रपट आला. या चित्रपटासाठी त्यांना पॅरिस येथे चित्रीकरणासाठी जावे लागले. या वेळी त्यांना जाणवू लागल की आपल नीतुवर प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी टेलिग्राम करून ‘ये सिखडी बडी याद आती है’ असे सांगितले.
ऋषी यांचे हे वाक्य नीतू यांना एवढे भावले की, त्यानंतर दोघांनी तब्बल पाच वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर 1980 मध्ये दोघांनी विवाह केला. काही वर्षातच त्यांना रणबीर आणि रिदिमा ही मुले झाली. 2018 मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सर आजाराचे निदान झाले.
त्यानंतर या आजाराच्या उपचारासाठी ते अमेरिकेत देखील जाऊन आले. काही दिवसांपूर्वी हा आजार बरा झाला असताना फेब्रुवारी महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.