नियमित ताक पिल्याने होतात हे चमत्कारिक आरोग्यवर्धक फायदे!

ताक म्हटल गोड, आंबट अशी चव लगेच जीभेवर येते. ताक कुणाला आवडते तर कोण ताक म्हटल की नाकमुरडत असतात. पण ताक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताकात विटामिन ” B 12 ”, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फायद्याचे असतात.
ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांना ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
ताक पिण्याचे हे आहेत फायदे
रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NEWS UPDATE याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.