दिव्या भारतीची बहीण दिसायला आहे एकदम ‘हॉट’ तुम्ही तिचे फोटो पाहिलेत का?

दिव्या भारतीची बहीण दिसायला आहे एकदम ‘हॉट’ तुम्ही तिचे फोटो पाहिलेत का?

90 मध्ये बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आज ती आपल्यात नाही. कमी कारकीर्द असली तरी एकेकाळी तिने बॉलिवूड गाजवले होते. तिने तिच्या छोट्या कारकीर्दीमध्ये अनेक दिगग्ज अभिनेत्यांसोबत काम केले आणि एकाहून एक हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपले नाव केले.

अशा हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्याची जागा इंडस्ट्रीत कोणीच घेऊ शकत नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पण, तिची बहीणही सौर्दंयाच्याबाबतीत तिच्यापेक्षा कमी नाही.

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाच्या ऑडिशनला तिने २०० स्पर्धकांवर मात केली. त्यानंतर तिला विवेक ओबेरॉयसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याचसोबत तिने गिप्पी गरेवाल याच्यासोबत ‘फरार’ या पंजाबी चित्रपटातही आपले नशीब आजमवले.

तिने बऱ्याच तमीळ चित्रपटांमध्येही काम केलेय. २०११ मध्ये आलेल्या ‘मनकथा’ आणि रामगोपाल वर्माच्या ‘सीक्रेट’ या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.दिल्लीमध्ये ‘एनएफआयटी’मध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या कायनातने ‘कॅडबरी’, ‘मारुती’ या ब्रॅण्डसह ‘लक्स’च्या जाहिरातींमध्ये काम केले.

मॉडेलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ‘फरार’ (२०१५) हा तिचा अखेरचा चित्रपट होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.