एकेकाळी छोट्याशा खोलीत राहायचे पंकज त्रिपाठी, पत्नीच्या पगारातून चालायचा घरखर्च, आज आहे एवढ्या कोटींचे मालक..

एकेकाळी छोट्याशा खोलीत राहायचे पंकज त्रिपाठी, पत्नीच्या पगारातून चालायचा घरखर्च, आज आहे एवढ्या कोटींचे मालक..

पंकज त्रिपाठी आज हे नाव कुणाच्या परिचयाचे नसेल. मनोज बाजपेयी यांचा आदर्श घेऊन चित्रपट सृष्टीत करियर करण्यासाठी पंकज त्रिपाठी देखील मुंबईत आले पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता त्यासाठी त्यांना अपार कष्ट सहन करावे लागले. प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागला. पण मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी त्यांचे स्थान मिळवलेच.

पंकज त्रिपाठी यांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे ‘गँग्स ऑफ वासेपुर’ ते ‘मिर्जापूर‘ पर्यंत पंकज यांना आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अभिनेता बनण्यासाठी पंकज यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. इतकंच काय तर सुरुवातीच्या काळात एकाच खोलीत पंकज त्रिपाठी यांचे कुटुंबाला रहावे लागत होते. उदरनिर्वाहासाठीही पुरेसे पैसे पंकज यांच्याकडे नसायचे. अशावेळी पत्नीच्या येणा-या पगारातून त्यांच्या संसाराचा गाडा चालायचा.

छोट्याशा घरात गुजराण केली असली तरी आज तिच छोटीशी खोली कोणत्याही महलापेक्षा कमी नसल्याचे पंकज त्रिपाठी सांगतात. जसं जसं काम मिळत गेले आणि कमाईही वाढत गेली. तसतसे पंकज यांचेही कुटुंबासाठी पाहिलेले सगळे स्वप्न पूर्ण होत गेले.

मुंबईत आपले सुद्धा हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची ईच्छा असते. प्रत्येकजण त्यासाठी हवी तितकी मेहनत करत असतो. हेच स्वप्न पंकज यांनीही पाहिले होते. आज मड आईलैंडमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये पंकज त्रिपाठी आपल्या कुटुंबासोबत राहतात. हा फ्लॅट पहिल्यांदा पंकज यांनी पत्नीला दाखवला तेव्हा पत्नीचे अश्रु अनावर झाले होते.

कुटुंबासाठी इतका मोठा फ्लॅट घेण्याचे पंकज यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. याचे एक वेगळेच समाधान आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील असेच आहे. पंकज त्रिपाठी आज एका सिनेमासाठी २५ ते १ कोटी इतके रुपये मानधन घेतात. सिनेमाच नाही तर जाहिरातीदेखील त्यांच्या कमाईचे साधन आहे. कुटुंबासोबत आज पंकज त्रिपाठी आलिशान आयुष्य जगत आहेत.

आज प्रत्येक OTT सिनेमात त्यांचा रोल असतोच. लॉकडाऊनमध्ये त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले. त्याच बरोबर नुकताच त्याचा मिमी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात त्यांच्या सोबत कृती सेनेनं आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत होत्या.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.