फोटोत दिसणारा ‘हा’ मुलगा कोरोना महामारीत बनलाय असंख्य लोकांसाठी देवदूत, आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता

फोटोत दिसणारा ‘हा’ मुलगा कोरोना महामारीत बनलाय असंख्य लोकांसाठी देवदूत, आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता

कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली होती. या काळामध्ये अनेक मजूर देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. सर्वाधिक मजूर हे महाराष्ट्रात अडकले होते. काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारने 11 लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवल्याचे सांगितले होते.

तरीदेखील राज्य सरकारवर अनेकांनी टीका केली होती. अनेक सामाजिक संस्थांनी रोज रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना जेवणाचे वाटप देखील केले. त्यानंतर मराठी कलाकारांनी देखील अनेकांना पैसे आणि जेवणाचे वाटप केले. अशोक सराफ यांनी तर पोलिसांना रस पुरी खाऊ घातल्याचे पाहिले असेल.

त्यामुळे त्याने परप्रांतीय मजुरांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. अनेकांना स्वखर्चाने पैसे देऊन मदत केली. त्यानंतर जवळपास शंभर बस करून त्यातून त्याने लोकांना पाठवले. रेल्वेतून देखील त्यांनी अनेक परप्रांतीय मजुरांना त्याच्या घरी पाठवले. यावेळी त्याने अनेकांना अन्नाचे पाकीट व पैशाची मदत देखील केल्याचे पाहायला मिळाले.

तसेच एक दिवस रात्री तर तो स्वतः रेल्वे स्टेशनला गेला होता. त्यानंतर परप्रांतीय मजुरांना भरून आले होते. सोनू सूद याच्या कामाचे बॉलिवूडमधून देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.सोनू सूद चा जन्म 30 जुलै 1973 रोजी पंजाब राज्यातील मोगा येथे झाला. त्यानंतर त्याचे बालपणीचे शिक्षण तिथेच झाले.

त्यानंतर मात्र उच्च शिक्षणासाठी त्याने नागपूर गाठले. नागपूर येथून त्याने इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली. अभिनय क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 1999 मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

2002 मध्ये त्याला शहीद ए आझम या चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका करण्याची संधी मिळाली. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला 2004 मध्ये मणिरत्नम यांच्या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटाचे नाव होते युवा.. या चित्रपटात अभिषेक बच्चन, अजय देवगण, करीना कपूर यांच्या भूमिका होत्या.

2005 मध्ये त्याने ‘आशिक बनाया आपने’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्याने तामिळ चित्रपटात देखील काम केले. 2010 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटात तर त्याची अफलातून भूमिका खूप गाजली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आर. राजकुमार या चित्रपटात देखील त्याने उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

त्यानंतर त्याला अनेक ऑफर येत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मजुरांना तो मदत करत आहे. या वेळी त्याला विचारण्यात आले की, तुला संक्रमण होण्याचा धोका वाटत नाही का? त्यावर तो म्हणाला, की जरूर वाटतो पण मला या मजुरांचे दुःख पाहायला जात नाही.

त्यामुळेच मी त्यांना खूप मदत करतो. मी कुटुंबात काळजी घेऊनच मिसळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सोनू सूद याचे वडील देखील सोनूप्रमाणे समाज कार्यात मग्न असायचे. त्यांनी आजवर अनेकांना मदत केल्याचे पाहायला मिळाले.

लहानपणी दिसायचा असा..

सोनू सूद लहानपणी अतिशय हुशार होता. त्याला विविध पदार्थ खाण्याची आवड देखील होती. तसेच खेळांमध्ये तो अतिशय पारंगत होता. लहानपणीचे त्याचे काही फोटो शेअर झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *