मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘प्रवीण तरडेची’ पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री….

मुळशी पॅटर्न चित्रपटामधून मराठी चित्रपट श्रुष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक, लेखक म्हणून नावारूपाला येणारे प्रवीण तरडे यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगलाच गाजला.
सत्याची जाण करून देणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट होता. या चित्रपटात प्रवीण तरडे यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची होती म्हणून या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे विशेष कौतुक झाले. प्रवीण तरडे सद्या मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.
पण आज आपण त्यांच्या पत्नी ₹बद्दल बोलणार आहोत. त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते आवर्जून सांगतात.
आपल्या पत्नीसाठी प्रवीण सोशल मीडियावर अनेकदा रोमॅण्टिक पोस्ट लिहितात. 2 डिसेंबर 2009 साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली. दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळं चित्रच बदललं, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.