‘कंटेंट उ’घडा होता पण नागडा नव्हता..’ राज कुंद्राच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद…

‘कंटेंट उ’घडा होता पण नागडा नव्हता..’ राज कुंद्राच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद…

राज कुंद्रा नाव सध्या सगळीकडेच चांगलेच चर्चेत आले आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा म्हणून केवळ सोशल मीडियावर ज्याला सर्व ओळखत होते. आता त्याला वेगळ्याच संदर्भाने सगळे ओळखत आहेत. अ’श्लील सिनेमा बनवणारा निर्माता म्हणून राज कुंद्रा ला सगळीकडे ओळखले जात आहे.

राज कुंद्रा एक मोठे उद्योगपती असून त्यांनी आपला काही पैसे खेळाच्या स्पर्धांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये देखील इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यामुळे नेहमीच त्यांच्या या कामाची चर्चा होत असे. स्टार वाहिनीसोबत मिळून त्यांनी आपल्या देशातील काही खेळांना पुन्हा नव्याने ओळख मिळावी यासाठी काही स्पर्धांचे आयोजन देखील केले होते.

मात्र याउलट गु’न्हेगाराचा वकील त्यामध्ये नक्की कोणती पळवाट निघत आहे हे शोधून काढतात आणि त्यावर पूर्ण केस लढतात, आश्चर्य म्हणजे अनेकवेळा जिंकतात देखील. आणि आता अशीच पळवाट राज कुंद्रा यांच्या वकिलाने शोधून काढली आहे. राज कुंद्रा यांनी बनवलेले सिनेमा हे व’ल्गर होते मात्र ते अ’श्लील नव्हते असा अजब युक्तिवाद त्यांचे वकील आबाद पौंडा यांनी दिला आहे.

पो’र्नोग्रा’फी म्हणजेच सं’भोग करताना, शरी’राच्या विशिष्ट भा’गाचे चित्रीकरण याचा समावेश असणे. मात्र राज कुंद्रा यांनी बनवलेल्या कोणत्याही सिनेमा मध्ये अश्या प्रकारे सं’भोग करतानाच एकही, व्हिडियो बनवण्यात आलेला नाहीये म्हणून हा गु’न्हा पो’र्नोग्राफी होत नाही. त्यामुळे राज कुंद्रा यांच्यावर लावण्यात आलेला, गुन्हा आणि केलेली अ’टक ही बे’कायदे’शीर आहे असं देखील त्यांच्या वकिलांनी बोललं आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे असं देखील राज कुंद्रा यांच्या वकिलांचा दावा आहे. मुळात, राज कुंद्रा यांच्या कंपनीने बनवलेला कंटेन्ट हा व’ल्गर जरी असला तरीही का’यदेशीर भाषेत त्याला अ’श्लील म्हणता येत नाही असं राज कुंद्राच्या वकिलांनी वारंवर म्हणत को’र्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान सर्व प्रकरणामध्ये, शिल्पा शेट्टीला अ’टक करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात येत आहे. मात्र तिच्या वि’रोधात कारवाई होणार का, किंवा तिच्या वि’रोधात पुरेसे पुरावे आहेत का याबद्दल पोलिसांच्या हाती कोणतीही माहिती लागलेली नाही. मात्र, राज कुंद्राच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून पुन्हा एका गोष्ट समोर येतेच, जोपर्यंत कायद्याने को’र्टात, गु’न्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गु’न्हा ग्राह्य धरला जात नाही. म्हणून आता या प्रकरणाला नक्की कोणते वळण मिळणार आहे हे बघणे रोमांचक ठरेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.