..म्हणून राजेश खन्ना यांनी मुलगी ट्विंकलला एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड बनवण्याचा दिला होता अजब सल्ला.. कारण वाचून थक्क व्हाल..!

..म्हणून राजेश खन्ना यांनी मुलगी ट्विंकलला एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड बनवण्याचा दिला होता अजब सल्ला.. कारण वाचून थक्क व्हाल..!

21 जून रोजी जगभरात मोठ्या उत्साहाने फादर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या वडिलांचे फोटो फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या अकाउंट वरून शेअर केले होते. त्याला चाहत्यांनी देखील तेवढाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

अनेक अभिनेते भावुक झाले होते. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये सध्या अनेक जण भावनिक पोस्ट देखील शेअर करत आहेत.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकजण घरात बंदिस्त आहेत.

लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांना टिंकल खन्ना की मुलगी झाली. तसेच त्यानंतर त्यांना रिंकी खन्ना हीदेखील मुलगी झाली. मात्र, काही वर्षातच राजेश खन्ना व डिंपल कपाडिया हे विभक्त राहू लागले. त्यामुळे दोघींच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यानंतर राजेश खन्ना हे व्यसनाच्या आहारी गेल्याचे आपण ऐकले असेल.

आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना ट्विंकल खन्नाने सांगितले की, माझे वडील मला नेहमी टिंकी बाबा असे म्हणायचे. मला ते बेबी कधीही म्हणायचे नाही. कारण ते माझ्यामध्ये मुलगाच पाहत होते. माझे त्यांचे नाते खूप हळवे होते. मात्र, इतर मुलांप्रमाणे आमचे पोषण झाले नाही.

हे आम्ही मान्य करतो. मी त्यांच्यासोबत अनेकदा मनमोकळेपणाने चर्चा करायचे. त्यामुळे आमच्यामध्ये खूप चांगले नाते होते. या जगामधील ते पहिले व्यक्ती होते की, त्यांनी मला पहिल्यांदा स्कॉचचा ग्लास हातात दिला होता.

म्हणजे त्यांनीच मला दारू पिण्यास दिली होती. या मुलाखतीत सांगितले की, अक्षय कुमार सोबत लग्न करण्याचा निर्णय त्यांना मी सांगितला होता. त्यानंतर त्यांनी होकार दिला होता. सध्या मी अक्षय कुमार सोबत खूप सुखी असून आपले जीवन खूप चांगल सुरू असल्याचे देखील तिने सांगितले.

चार बॉयफ्रेंड बनवण्याचा दिला होता सल्ला
या मुलाखतीमध्ये टिंकल खन्ना म्हणाली की, मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल वडिलांसोबत नेहमी चर्चा करत असे. ते देखील मला मनमोकळेपणाने सल्ला देत असे. मला त्यांनी मुलाप्रमाणेच वागवले होते.

मी वयात आल्यानंतर डेटिंग करायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी त्यांचा सल्ला आवर्जून घेत होते. मी माझ्या बॉयफ्रेंड बद्दल त्यांना माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी मला खूप मार्गदर्शन केले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की, तू चार बॉयफ्रेंड कर.

याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले होते की,तू चार बोयफ्रेंड ठेव. याचे कारण असे की, एकाकडून तुझा प्रेमभंग झाला तर तुला लगेच दुसरा बॉयफ्रेंड उपलब्ध असेल. यावर ट्विंकल खन्ना ऐकून हादरली होती. मात्र, तिने आयुष्यात असे काही केल्याचे ऐकिवात नाही.

राजेश खन्ना हे अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. मात्र, ते दारूच्या आहारी गेल्यापासून त्यांचे करियरची वाट लागली होती. स्टार ड म पासून ते दूर गेले होते, याचे दुःख त्यांना जास्त होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *