राजपाल यादवची पत्नी दिसण्यात बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, दिसते इतकी सुंदर की….

राधा मुंबईत पहिल्यांदा आली तेव्हा राजपालनं तिला खास सरप्राईज दिलं होतं. तिला इंम्प्रेस करण्यासाठी राजपालनं खास तयारी केली होती.
राजपालने 10 जून 2003 रोजी दुसरे लग्न केलं. राधा ही राजपालची दुसरी पत्नी आहे. ‘हिरो’ सिनेमाच्या शूटिंगसाठी राजपाल कॅनडाला गेला होता. त्यावेळी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राजपाल आणि राधाची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. दोघांच्या उंचीत दोन इंचाचा फरक आहे.
राधा मुंबईत पहिल्यांदा आली तेव्हा राजपालनं तिला खास सरप्राईज दिलं होतं. तिला इंम्प्रेस करण्यासाठी राजपालनं खास तयारी केली होती. त्याने घराचं इंटिरिअर खास पद्धतीने तयार केले होते.
कॅनडातील ज्या हॉटेलमध्ये दोघांची पहिली भेट झाली त्या रुमप्रमाणे राजपालने आपल्या घराचे इंटिरिअर केले होते. राजपाल आणि राधा यांच्या आयुष्यात हनी नावाची एक छोटी लेक आहे.