राखी सावंत म्हणते, सुशांतने स्वप्नात येऊन सांगितले, तुझ्याच पोटी जन्म घेणार..Video व्हायरल !

राखी सावंत म्हणते, सुशांतने स्वप्नात येऊन सांगितले, तुझ्याच पोटी जन्म घेणार..Video व्हायरल !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे जग सोडून आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंत अनेक वाद-विवाद समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक जणांची चौकशी देखील होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. तिने महत्वपूर्ण माहिती दिल्याचे सांगण्यात येते. त्याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे हीची देखील चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

तसेच काही मोठे प्रोडक्शन हाऊस यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. अभिनेता सलमान खान याने त्याच्याकडील चित्रपट काढून घेतले होते, अशी देखील चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. आता यामध्ये आणखीन एक नाव भरीस भर पडले आहे. ते म्हणजे मराठमोळ्या राखी सावंत राखी सावंत हिचे.

भारत-पाकिस्तानचा वाद असो किंवा आणखी काही विषय असो. राखी सावंत यामध्ये आवर्जून उडी घेते. मध्यंतरी तिने आपले लग्न झाले असून आपल्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियातून शेअर केले होते. हा देखील खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता. आता तिने सुशांत सिंह राजपूतबाबत नवा दावा केला आहे.

त्यामुळे राखी सावंत हिने केलेला दावा हा हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे. तसेच तिला कोणी गंभीरतेने दखल घेत नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ती केवळ प्रसिद्धीसाठी असे उठाठेव करत असल्याचे सांगण्यात येत आहेत.याबाबत राखी सावंत म्हणाली की, मी दोन दिवसापूर्वी गाढ झोपेत होते. त्यावेळी मला एक स्वप्न पडले.

माझ्या स्वप्नात सुशांत सिंह राजपूत आला आणि तो मला म्हणू लागला की, मी लवकर जन्म घेणार आहे. मी त्याला विचारले, असे कसे शक्य आहे तर तो मला म्हणाला की, मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. त्यावर मी त्याला म्हणाले, असे कसे शक्य होईल.


मात्र, तो सांगत राहिला की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तसेच तो म्हणाला की, या बॉलिवूडने माझा खूप छळ केलेला आहे. त्यामुळे मी सर्वांचा बदला घेणार आहे. माझे शरीर जरी नसले तरी माझा आत्मा जिवंत आहे. हे त्याचे वाक्य ऐकून मला एकदम घामच फुटला आणि त्यावेळी सकाळचे चार वाजले होते आणि चार वाजता पडलेले स्वप्न हे खरे होते, असेही ती म्हणाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.