अजय देवगणसोबत झळकलेली अभिनेत्री झोपडपट्टीतील २०० कुटुंबीयांना देतेय जेवण…

संपूर्ण जगाप्रमाणे भारतामध्ये दिवसें दिवस कोरोना रुग्णांची आणि कोरोनामुळे बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत सध्या सामाजिक,आर्थिक संक्रमणाच्या एका वेगळ्या टप्प्यावर उभा आहे.
संपूर्ण जगभरामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामधून बहुतांश लोकसंख्या ही अन्न, वस्त्र ,निवारा या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी कोसो दूर आहे .कोरोनाच्या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये रोजीरोटी मिळवण्यासाठी महानगरांमध्ये येऊन वस्ती केलेली गोरगरीब कुटुंब दररोज काम केले तर संध्याकाळी मिळणाऱ्या कमाईवर ज्यांची भाकरी अवलंबून असते.
कोरोनामुळे मार्च महिन्याच्या मध्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाऊन केले होते त्यामुळे राकुलच्या गुरुग्राम येथील निवासस्थानाच्या आजुबाजूला असलेल्या झोपडपट्टी परिसरातील जवळपास दोनशे कुटुंबीयांच्या रोजगारावर गदा आली होती. त्यांच्यासमोर रोजच्या अन्नपाण्याचाही प्रश्न निर्माण झाला हे जेव्हा राकुलच्या वडिलांना समजले तेव्हा त्यांनी या दोनशे कुटुंबीयांना जेवण पुरवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.
ह्या दोनशे कुटुंबीयांसाठी पुरवले जाणारे जेवण राकुल ज्या सोसायटीमध्ये राहते त्याठिकाणी दररोज ताजे अन्न बनवले जाते व या कुटुंबीयांना पुरवले जाते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लाँकडाऊन चा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र हा कालावधी वाढला तरी या संपूर्ण कालावधीमध्ये आपण या गरजू लोकांना दोन वेळचे अन्न पुरवतच राहू असे राकुलने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
राकुल प्रीत ही अजय देवगण सोबत मुख्य भूमिकेत असलेल्या दे दे प्यार दे या चित्रपटातून प्रकाश झोतात आली आहे.राकुल प्रीत आपल्या बॉलीवूडमधील करियरच्या अगोदर मिस इंडिया किताबाची विजेती सुद्धा राहिली आहे. राकुलने आपल्या अभिनयाची व सौंदर्याची छाप दाक्षिणात्य भाषांमधील कन्नड ,तेलुगू ,तामिळ या चित्रपटांमध्ये सुद्धा पाडली आहे.