‘रामायण’ मालिकेतील ‘भरत; यांचा मुलगा आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटात केलंय काम.

जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 मार्चला 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले होते. तेव्हा पासून लोक आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे.
दरम्यान बाहेर जाता येत नसल्यामुळे आणि घरात वेळ चांगला जावा म्हणून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 80 च्या दशकातील मालिका पुन्हा सुरू करण्यात याव्या अशी मागणी होत होती. त्यात सर्वात जास्त 80 च्या दशकात गाजलेली रामायण ही मालिका सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.
म्हणून आज आपण रामायणातील भरत म्हणजे संजय जोग यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. संजय जोग यांनी अनेक मराठी हिंदी आणि गुजराती मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 30 पेक्षा जास्त मराठी चित्रपटात काम केले आहे.
पण त्यांचा मुलगा देखील प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे आणि त्याने अनेक मराठी हिंदी मालिका, चित्रपटात काम केले आहे. संजय जोग यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा देखील प्रसिद्ध मराठी कलाकार आहे. चला तर मग त्याच्याबद्दल जाणून घेऊया.
संजय जोग यांच्या मुलाचे नाव रणजित जोग आहे आणि तो सद्या कलर्स वाहिनीवरील लक्ष्मीनारायण या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. रणजित जोग हा मराठी चित्रपट श्रुष्टीत सर्वाना परिचित अभिनेता आहे. आपले पणजोबा नाना जोग यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट या नाटकात रणजीतने महत्वाची भूमिका बजावली आहे.
इतकंच काय तर रणजितने ‘ही पोरगी कोणाची’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘ रणजित ने अनेक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यासोबत एक होतं पाणी, आव्हान, लपून-छपून यांसारख्या चित्रपटांतही त्याने काम केले आहे.
रामायण मालिकेबद्दल बोलायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेने 2015 पासूनचे ‘टीआरपी’चे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. आणि या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.