रामायणातील ‘सीता’ वयाच्या ‘६० पार’ नंतर आता दिसते ‘अशी’, फोटो पाहून विश्वास बसणार नाही.

जगभरात करणामुळे हाहाकार माजला नंतर आपल्या देशानेही 21 दिवस ब्लॉक डाऊन घोषित केले आहे त्यामुळे लोक घरात असल्यामुळे त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे म्हणून दूरदर्शन वरील सर्वात लोकप्रिय मालिका रामायण पुन्हा एकदा सुरू झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आठवणींचा उजाळा या मालिका मार्फत होणार आहे.

पण रामायण ही मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर सुरू झाल्यामुळे या मालिकेतील सर्व पात्रे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि सर्वांना त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणून आज आपण रामायणामध्ये सीता चा अभिनय करणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.
त्यांच्या सौंदर्यमागे नियमित योगा आणि योग्य डायट हेच रहस्य आहे. त्याचबरोबर दीपिका यांना सोशल मिडियाची देखील अत्यंत आवड आहे. त्यांना सोशल मीडियावर वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे त्या सतत सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे एक से बढकर एक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसह संपर्कही साधत असतात.
दरम्यान दीपिका यांनी २५ वर्षानंतर ‘छुटा छेडा’ या गुजराती मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. दीपिका या सुरूवातीपासून कामाला घेऊन खूप सिलेक्टीव्ह राहिल्या आहेत. मनापासून भूमिका आवडली तर ती ऑफर त्या स्विकारतात हाच नियम त्यांनी पाळला आहे. त्यामुळेच की काय, अगदी कमी प्रोजेक्टमध्ये आपल्याला दीपिकाचे दर्शन घडते. दीपिका यांनी काही मालिकेत काम केले.

त्यानंतर एका कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न झाल्यानंतर दीपिका यांनी स्वतःहून इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. मनोरंजन ही स्ट्रीम सोडल्यानंतर दीपिका यांनी आपल्या व्यवसायात पतीची मदत केली.
दीपिका यांना दोन सुंदर मुली आहेत निधी आणि जुही. दीपिका यांनी नेहमीच करिअर आधी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्या संसारात रमल्या आणि या झगमगाटाच्या दुनियेपासून लांब जात आपले क्वॉलिटी टाईम एन्जाय करण्यात बिझी झाल्या.
आता पुन्हा एकदा ८० च्या दशकातील रामायण सुरू झाले आहे म्हटल्यावर नव्या पिढीलाही तो काळ अनुभवण्याची आणि रामायण समजून घेण्याची पर्वणीच मिळणार हे मात्र नक्की, आणि तो काळ देखील लोक एन्जॉय करत आहेत.