रामायणात ‘लव कुश’च्या भूमिकेत झळकणारे दोन्हीही बालकलाकार आहेत मराठी, तुम्ही ओळखलंत का?

कोरोना व्हायरसच्या विश्व भरातील वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे एकाच वेळी सर्व जगभरात लाँकडाऊन करण्यात आले आहे. लाँकडाऊन च्या परिस्थितीमुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाचा, आधुनिकीकरणाचा अवलंब होण्यापूर्वीच्या काळामध्ये अगदी एका क्षणात मागे काळाची चक्रे फिरवून गेल्यासारखे वाटत आहे.
घरात बसल्यावर लोकांना वेळ घालवणे मुश्कील होऊ लागले आहे अशा परिस्थितीमध्ये मनोरंजनाची साधने शोधण्यावर भर दिला जात आहे. टेलिव्हिजनच्या क्रांतीनंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डेली सोप्सचा जमाना सुरू झाला होता.
लोकांना नाँस्टँलजियाचा अभास या सिरियलमुळे मिळतो आहे. या सिरीयल प्रसारित करण्यास सुरुवात झाल्यापासून संबंधित चँनलचा टीआरपीसुद्धा झपाट्याने पुढे सरकला आहे. रामायण या मालिकेत श्री राम प्रभू यांच्या जीवनावर आधारित चरित्राला प्रेक्षकांची जास्त पसंती आहे.
यावेळी नव्वदच्या दशकांमध्ये रामायण प्रसारित व्हायचे त्या काळात मालिकेमध्ये कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मालिकेतील राम-सीता-लक्ष्मण यांना चाहते चरण स्पर्श करत असत म्हणजे त्यांना अक्षरशः देव मानले जात असे.
आत्तासुद्धा ही सीरियल प्रसारित व्हायला लागल्यापासून रामायण मालिकेतील सर्व पात्र सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आले आहेत. रामायणामधील पुढील काही भागांमध्ये भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या पुत्रांच्या भूमिकेतील लवकुश या पात्रांचा प्रवेश होणार आहे.
लव आणि कुश यांच्या भूमिका साकारणारे बालकलाकार नक्की कोण होते याचा सुद्धा शोध चाहत्यांकडून घेतला जात आहे. या मालिकेमध्ये कुश ही भूमिका चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मराठी चित्रपट सृष्टी मध्ये तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या स्वप्निल जोशी याने साकारली होती हे क्वचितच काही चाहत्यांना माहिती असेल.
स्वप्निल जोशी यांनी श्री कृष्णा या सिरीयल मधील भगवान श्रीकृष्णाचे लोकप्रिय पात्रही साकारले होते बालकलाकार म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आपले करियर सुरू केल्यानंतर स्वप्नील मितवा, दुनियादारी, तुही रे यांसारख्या चित्रपटांत सोबतच नुकतेच समांतर या वेब सिरीजमध्ये सुद्धा अगदी भक्कम असे पात्र साकारले आहे.
स्वप्निल जोशी चाहत्यांमध्ये एक चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र त्यांनी आत्तापर्यंत केवळ रोमांटिक चित्रपटच नव्हे तर अनेक विषयांवरील कथानकांवर आधारित चित्रपटांची निवड केली आहे.
लव आणि कुश भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांनी सिरीयल मधील अन्य मातब्बर कलाकारांच्या बरोबरीने अभिनय केला होता आणि तितकीच प्रसिद्धी सुद्धा त्यांना मिळाली होती. सिरीयलमध्ये लवची भूमिका साकारणाऱ्या मयुरेश क्षेत्रमाडे याने मात्र या मालिकेनंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपले कारकिर्द पुढे चालू ठेवली नाही.
तो सध्या परदेशामध्ये स्थायिक आहे. मयुरेश न्यू जर्सी मध्ये वास्तव्य करत आहे. रामायण या पहिल्या आणि एकमेव मालिकेमध्ये त्याने अभिनय केला होता. मयुरेश यनिव्हर्सिटी आँफ टेक्सास अँट आँस्टीन या कंपनीमध्ये या सीईओ या पदावर कार्यरत आहे.