रामायण मालिकेतील ‘कैकई’ पहा आता कशी दिसते…अनेक मराठी चित्रपटातही केले आहे काम..

रामायण मालिकेतील ‘कैकई’ पहा आता कशी दिसते…अनेक मराठी चित्रपटातही केले आहे काम..

आज आपण रामायण मालिकेत कैकईची भूमिका ज्या अभिनेत्रीने साकारली आहे त्यांच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

रामानंद सागरच्या रामायणात कैकयीची भूमिका साकारणाऱ्या ‘पद्मा खन्ना’ मार्चमध्ये आपला 71 वा वाढदिवस साजरी केला होता. पद्माने रामायणात कैकईची भूमिका इतक्या उत्कृष्टपणे साकारली की लोकांनी त्यांना खऱ्या आयुष्यात कैकई म्हणून ओळखण्यास सुरवात केली. पद्मा आता बर्‍याच वर्षांपासून अभिनयाच्या जगापासून दूर आहेत.

रामायणात कैकेईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव ‘पद्म खन्ना’ आहे. या अभिनेत्रीची रामायण मालिकेत विरोधी भूमिका असल्यामुळे शूटिंग दरम्यान ढसा ढसा रडायची. रामायण मालिकेत दशरथ राजासोबतच्या महाराणी कैकेईच्या एका सिन दरम्यान जेव्हा कैकई रामाला वनवासात जायला सांगते.

त्यावेळी हे चित्रीकरण चालू असतानाच पद्मा खन्ना यांना आपले अश्रू अनावर व्हायचे आणि कित्येक वेळ त्या सेटवरच ढसाढसा रडायच्या. त्यांचे हे रडणे पाहून स्वतः रामानंद सागर यांनाही आपले अश्रू लपवता येत नव्हते. पद्मा खन्ना या उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जातात. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी बिरजू महाराज यांच्याकडून कथकचे प्रशिक्षण घेतले आहे.

सुरुवातीला एक भोजपुरी अभिनेत्री म्हणून त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी भैय्या या चित्रपटातुन पदार्पण केले. पण त्यांना खरा ब्रेक मिळाला तो 1970 साली आलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातून. त्यांनी साकारलेला अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा “सौदागर” हा चित्रपट खूपच संस्मरणीय ठरला. बिवी और मकान, हिर रांझा, जॉनी मेरा नाम, पाकिजा यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले.

त्याचबरोबर त्यांनी मराठीतील देवता, माफीचा साक्षीदार या चित्रपटात काम केले. देवता चित्रपटातील “खेळ कुणाला दैवाचा कळला” हे गाणे पद्मा खन्ना यांच्यावर चित्रित झाले. त्याचप्रमाणे अनेक चित्रपटातून त्यांच्या नृत्याची झलकदेखील पाहायला मिळाली.

बॉलिवूड दिग्दर्शक जगदीश सीदाना यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर पद्मा खन्ना अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या पतीसोबत त्यांनी तिथे नृत्याचे क्लासेस सुरू केले. मुलांचा सांभाळ आणि शिक्षणामुळे त्या भारतात परतल्या नाही. याचदरम्यान त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि पहिल्या पतीची एक मुलगी आहे.

त्यानंतर कुटुंबाची सर्व जबादारी पार पाडत आपल्या मुलांनाही त्यांनी आपल्या क्लासमध्ये सहभागी करून घेतले. आज इतक्या वर्षानंतर रामायण मालिकेमुळे पद्मा खन्ना यांची आठवण झाली. त्या आता कशा दिसतात आणि काय करतात यासंबंधी सोशल मीडियावर बरीच विचारणा झालेली पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने हे विस्मृतीत गेलेले कलाकार पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आलेले पाहायला मिळत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *