रामायणात सीतेचा अभिनय करणारी दीपिका म्हणाली, बॉलिवूडच्या रामायणात फक्त हेच कलाकार राम आणि सीतेचा अभिनय करू शकतात.

रामायणात सीतेचा अभिनय करणारी दीपिका म्हणाली, बॉलिवूडच्या रामायणात फक्त हेच कलाकार राम आणि सीतेचा अभिनय करू शकतात.

रामायणात सीतेची भूमिका साकारणारी दीपिका बॉलिवूडच्या रामायणवर प्रतिक्रिया दिली आहे. रावणाच्या भूमिकेसाठी तिने या कलाकारांचे नाव सुचवले आहे.!

कोरोनाव्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता २१ दिवसांसाठी भारत बंद आहे. अशा परिस्थितीत पुन्हा रामायणाचे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण सुरू झाले आहे. लोकांना आजही रामायण या पौराणिक मालिकेचे प्रचंड प्रमाणात आकर्षण दिसून येत आहे.

रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने नुकतीच बॉलिवूड लाइफला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी रामायणाबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले. तसेच, बॉलिवूडमध्ये जर रामायणावर चित्रपट निघाला तर आपल्याला या पात्रांमध्ये कोण पाहायला आवडेल या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले.

दीपिका चिखलिया म्हणाली: “रामायणचे बरेच व्हर्जन आले आहेत. सीता एक उंच महिला नव्हती, तिचे डोके भगवान रामच्या छातीपर्यंत पोचत असत, म्हणून सीताच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट बरोबर असेल. भगवान रामाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन बरोबर असेल.

तर रावणच्या भूमिकेसाठी अजय देवगण हे एक उत्तम पर्याय असतील. लक्ष्मणच्या भूमिकेत वरुण धवन बरोबर असेल. अशाप्रकारे ” दीपिका चिखलियाने या बॉलिवूड रामायणवर आपले मत दिले. दीपिका देखील भाजपा सदस्य आहेत. सीतेची भूमिका साकारण्यासाठी त्यांना चार स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.

रामायण पुन्हा सुरू केल्याची माहिती, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केली होती. माहिती व प्रसारण मंत्री यांच्यानुसार प्रेक्षकांच्या मोठ्या मागणीनंतर ‘रामायण’ सीरियल दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर ही मालिका ९० च्या दशकात दाखविली गेली होती.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने असा करिष्मा तयार केला होता, जो आजही चर्चेत आहे. या सीरियलच्या वेळी लोक टीव्हीसमोर बसायचे त्यावेळी रस्ते, निर्जन असायचे. अनेक लोक श्रद्धेमुळे हात जोडून हा कार्यक्रम पाहत असत. लोकांनी मालिकेत काम केलेल्या अरुण गोविल (राम), दीपिका (सीता) या कलाकारांची पूजा केली जायची. या मालिकेत दारा सिंग यांनी हनुमानची भूमिका साकारली होती.

गंमतीची गोष्ट म्हणजे या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणार्‍या लोकांना वास्तविक देवाचा दर्जा देण्यात आला होता. या मालिकेत लक्ष्मणची भूमिका सुनील लाहिरी यांनी केली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *