अमिताभ बच्चनसोबत ‘काम’ केलेल्या मराठी अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला स्वतःच्या घरी आसरा

अशोक सराफ यांचा ‘धूमधडाका’ चित्रपट आपण पाहिलात का ? या चित्रपटात आलेले ‘प्रियतमा प्रियतमा’ हे गाणे प्रचंड गाजले होते. आजही हे गणे रसिकांना आवडते. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. यात अशोक सराफ यांची भूमिका अतिशय गाजली होती.
सध्या ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचे खूप हाल होत आहेत. काही परप्रांतीयांना गावाकडे जायचे आहे. मात्र, त्यांना या यातून मार्ग काढता येत नाही. दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने इतर राज्यात जाण्यासाठी परप्रांतीयांना परवानगी दिली आहे.
मात्र, त्यानंतर तिला अपेक्षित यश मिळाले नाही. काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी ती निघाली होती. मात्र, लॉक डाऊन असल्यामुळे पोलिसांनी तिला समोर जाऊ दिले नाही. ही बाब केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना समजली. त्यानंतर आठवले यांनी ऐश्वर्या राणे यांना आपल्या घरी आणले.
15 एप्रिल रोजी ते राणे यांना आपल्या घरी येऊन आले. त्यानंतर हे आपलेच घर समजा, असे सांगून त्यांनी त्यांच्या घरातच ठेवले. त्यांच्या आदरसत्काराने ऐश्वर्या खूपच भारावून गेल्या. तसेच आपल्याला सिंधुदुर्गमध्ये छोटेसे घर द्यावे, अशी विनंती देखील त्यांना केली.
अमिताभ सोबत केले आहे काम
ऐश्वर्या राणे यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका गाण्यांमध्ये देखील ऐश्वर्या राणे यांनी काम केले आहे.
या गाण्यांमध्ये एक घोड्याचा सीन होता. त्यावेळी त्या घोड्यावरून खाली पडले. त्यानंतर त्यांचे पाठीचे हाड मोडले. त्यामुळे त्यानंतर त्यासारख्या आजारी राहू लागल्या. आता त्यांना थोडी पेन्शन मिळते. दरम्यान, काही वर्षापूर्वी पेन्शनसाठी त्यांना मंत्रालयात देखील ये-जा करावी लागली होती. त्यानंतर काही सामाजिक संघटनांनी त्यांची मदत केली होती.
दरम्यान, आता लॉक डाउन संपेपर्यंत ऐश्वर्या राणे या रामदास आठवले यांच्या घरी राहणार आहेत. या वेळी आठवले यांच्या पत्नी त्यांची स्वतःची काळजी घेत आहेत.