ऋषी कपूर यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर

ऋषी कपूर यांची ‘ही’ इच्छा पूर्ण करु शकला नाही रणबीर

मागील दोन दिवस हे बॉलिवूड साठी काळे दिवस ठरले आहेत. याच दोन दिवसात बॉलिवूड ने दोन दिगग्ज गमावले त्यात एक म्हणजे आपल्या अप्रतिम आणि उत्तुंग अभिनयाने आपली वेगळी छाप सोडणारे इरफान खान आणि जेष्ठ सदाबहार अभिनेते ऋषी कपूर.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते.

‘जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा मी २७ वर्षांचा होतो आणि रणबीर आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार करायला हवा. रणबीर त्याला आवडत असलेल्या मुलीशी लग्न करु शकतो आणि माझा त्याला पाठिंबा असेल.

जेव्हा कधी रणबीर लग्नासाठी तयार होईल मला आनंदच होईल. त्याच्या आनंदात माझा आनंद आहे. मला मरणाआधी माझ्या नातवंडांसोबत देखील वेळ घालवयचा आहे’ असे ऋषी कपूर यांनी शेवटी म्हटले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *