रणवीरच्या ‘या’ टोपीच्या किंमतीत आपली संपूर्ण उन्हाळ्याची शॉपिंग होईल, तर किंमत बघूनच थक्क व्हाल !

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो.
त्याच्या अतरंगी फॅशनची चर्चा होणार नाही असं होतंच नाही. रणवीरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नुकताच एक सेल्फी पोस्ट केला. या सेल्फीमध्ये त्याने घातलेल्या निळ्या टोपीची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. या टोपीच्या किंमतीत संपूर्ण उन्हाळ्याची शॉपिंग होईल.
काळ्या रंगाच्या एब्रॉयड्रीमध्ये लोगो प्रिंट केलेला निळ्या रंगाचा हा बेसबॉल कॅप आहे. ‘ऑफ व्हाइट’ असं या टोपीच्या ब्रँडचं नाव आहे. या ‘मेड इन इटली’ कॅपची किंमत ही सर्वसाधारण बेसबॉल कॅपच्या २० पटींनी अधिक आहे. सुमारे २० हजार रुपयांची ही टोपी आहे. ज्यामध्ये संपूर्ण उन्हाळ्याची शॉपिंग सहजरित्या होऊ शकते. हो ना?