अमाप संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहतात ‘या’ 5 अभिनेत्री, पहा नंबर ४ ची अभिनेत्री अरबपती असूनही…

अमाप संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहतात ‘या’ 5 अभिनेत्री, पहा नंबर ४ ची अभिनेत्री अरबपती असूनही…

बॉलीवूड सेलिब्रिटीज आपल्या कामासाठी कमी आणि खाजगी आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतात. कोणत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच सर्वाना असते. यामध्ये कोणी कधी कुठे घर खरेदी केले, किंवा ते कुठे राहत आहेत याबद्दल जाणून घेण्यास देखील त्यांचे चाहते आतुर असतात. यामध्ये, बॉलीवूडमधील काही सुपरहिट तारका म्हणजेच अभिनेत्री अजूनही भाड्याच्या घरातच राहतात.

१. कॅटरीना कैफ:- २००३ साली बूम या सिनेमामधून कॅटरीनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या काही सिनेमामध्ये तिला स्वतःची ओळख निर्माण करण्यात अपयश आले. मात्र त्यानंतर, तिला गॉडफादर म्हणून सलमान खान भेटला आणि तीच नशीब बदललं. पार्टनर या सिनेमाने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली, आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पाहिलं.

आपल्या एका सिनेमासाठी कॅटरीना जवळपास तीन ते पाच कोटी रुपये घेते. मात्र, हे खूप कमी लोकांना माहित आहे की, कॅटरीनाकडे इतका जास्त पैसे असून देखील ती भाड्याच्या घरातच राहते. सुरुवातीचे काही वर्ष ती सलमान खानच्याच एका फ्लॅटमध्ये राहत होती, त्याच्यासोबत ब्रेकअप झालं आणि तिने आपला फ्लॅट बदलला. त्यानंतर काही दिवस, ती रणबीर सोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याच्या चर्चाना देखील उधाण आलं होत. काहीही असले तरीही, करोडपती कॅटरीना आजही भाड्याच्याच घरात राहते.

२. हुमा कुरेशी:- गँग्स ऑफ वासेपूरमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी हुमा नेहमीच चर्चेत असते. हुमाने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे. केवळ हिंदीच नाही तर साऊथच्या देखील काही सिनेमामध्ये हुमाने काम केले आहे. त्याचबरोबर अनेक वेब-सिरीजमध्ये देखील ती झळकली आहे.

आज हुमाची कमाई कोटींच्या घरात आहे. असं असलं तरीही, हुमाने अजून पर्यंत मुंबईमध्ये आपलं घर खरेदी केलं नाहीये. काही दिवसांपासून, सोहेल खान आणि तिच्या अफेअरच्या चर्चाना उधाण आले आहे. सोहेल खान आणि ती एकाच फ्लॅटमध्ये राहतात आणि तो फ्लॅट गॅलक्सी अपार्टमेंटपासून अवघ्या काहीच अंतरावर आहे.

३. इलियाना डी क्रूज:- साऊथमध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना वेड लावणाऱ्या इलियानाने बर्फी सारख्या दमदार सिनेमामधून, बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलीवूड सिनेमामध्ये काम देखील केले आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण इलियना जवळपास २ लाख रुपये भाडं भरते. तिने अजूनपर्यंत मुंबईमध्ये घर विकत घेतले नाहीये.

४. अदिती राव हैद्री :- अदिती राव हैद्री एका राजेशाही कुटुंबातील आहे. असं असलं तरीही, तिने आपली वेगळी आणि खास अशी ओळख बनवली आहे. पद्मावत सारख्या सिनेमामध्ये तिने आपल्या सौंदर्याने, दीपिकाला देखील टक्कर दिली होती. अदितीने बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमामध्ये काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी, तिच्या आणि फरहान अखतरच्या अफे’अरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यामुळे ती, फरहान अखतरच्या घरच्या जवळच्या अपार्टमेंट राहते असं देखील काही वृत्तपत्रांनी माहिती दिली होती. अदिती दीड लाख रुपये भाडं देते.

५. नर्गिस फकीरी:- २०११ मध्ये नर्गिसने इम्तियाज अलीच्या रॉकस्टार सिनेमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला सिनेमा तर सुपरहिट ठरला, मात्र तिला हवं तस यश मिळालं नाही. तिने अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये काम केले आहे. ती वर्षाला कोटींच्या घरात पैसे कमावते. पण अजूनही नर्गिस भाड्याच्याच घरात राहते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *